आधी उर्मिला गित्तेंनी सभापतीपद गमावलं, नंतर पतीला अटक, परळीत तणाव

परळी पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधातला अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आणि त्यांनी पद गमावलं.

आधी उर्मिला गित्तेंनी सभापतीपद गमावलं, नंतर पतीला अटक, परळीत तणाव
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 8:05 PM

बीड :  परळीच्या राजकारणाने आज दोन मोठ्या घडामोडी बघितल्या. पहिली- पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधातला अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आणि त्यांनी पद गमावलं. त्या भाजपच्या सभापती होत्या आणि त्यांना हटवण्यासाठी राष्ट्रवादीला मदत केली ते काही भाजपच्याच सदस्यांनी…. ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना उर्मिला गित्ते यांचे पती शशिकांत गित्ते यांना परळी पोलीसांनी अटक केलीय. जमावबंदी तोडून गर्दी जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासाठीच त्यांच्यावर कारवाई केली गेलीय. आधी अविश्वास ठराव आणि नंतर पतीला अटक त्यामुळे परळीत तणाव निर्माण झाला. (Parli police arrested Shashikant Gitte husband of Parli Panchayat Samiti chairperson Urmila Gitte)

परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात आज दुपारी (गुरुवार) बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. याप्रसंगी भाजपच्या सदस्यांनी चक्क राष्ट्रवादीला मदत केली. भडकलेल्या गित्ते समर्थकांनी जमावबंदीचे नियम तोडून गर्दी गित्ते यांच्या निवासस्थानाबेहर गर्दी केली. यानंतर शशिकांत गित्ते यांना परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे.

परळी पंचायत समिती सभापती म्हणून उर्मिला शशिकांत गित्ते या काम पाहत होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला. यामुळे गित्ते समर्थक चांगलेच भडकलेले होते. चिडलेल्या गित्ते समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करायला सुरुवात केली. अखेर जमावबंदीचे नियम तोडून गर्दी केल्याप्रकरणी शशिकांत गित्ते यांना परळी पोलिसांनी अटक केली आहे.

अविश्वास ठरावाच्या वेळी सभापती गित्ते या गैरहजर होत्या. यावेळी चक्क भाजप सदस्यांनी राष्ट्रवादीला मदत केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. तसंच यानिमित्ताने मुंडे भाऊ-बहिणींमधील दुरावा कडवटपणा दूर होत असल्याची चर्चा होत आहे.

परळी पंचायत समिती सदस्यांनी सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरुध्द जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या अनुशंगाने आज परळी तहसील कार्यालयात पंचायत समिती सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकीला पंचायत समिती 11 पैकी 10 सदस्य हजर होते तर उर्मिला गित्ते या स्वःता गैरहजर असल्याने 10 हजर सदस्यांनी सभापती विरुध्द अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उभे करुन मतदान केल्याने सभापतीविरोधात ठराव मंजूर झाला आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तहसील व शहरात मोठा पोलिस फाटा तैनात होता.

मुंडे भावंडांतील राजकीय कडवटपणा दूर?

एरवी कट्टर राजकीय विरोधक म्हणून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे राज्यातील राजकारणात परिचित आहेत. 12 डिसेंबर रोजी बंधू धनंजय मुंडे यांनी राजकीय कडवटपणा चालेल पण घरात सुसंवाद हवा, असं सूचक वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याला धरुन आज गित्ते यांच्या अविश्वास ठरावावर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे बहिण भावंडातील राजकीय कडवटपणा दूर होतोय की काय? अशा चर्चेला परळीच्या नाक्यानाक्यावर सुरुवात झाली आहे. (Parli police arrested Shashikant Gitte husband of Parli Panchayat Samiti chairperson Urmila Gitte)

संबंधित बातम्या

परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पंचायत समिती सभापतीवर अविश्वास

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.