Latur : लातूरच्या ग्रामपंचायती ‘लयभारी’, शासनाच्या आवाहानाला ‘असा’ हा प्रतिसाद…!
शिक्षण क्षेत्रामध्ये जसा 'लातूर पॅटर्न' चा दबदबा आहे अगदी त्याप्रमाणेच ग्रामपंचायतीनेही कारभारात तत्परता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नोव्हेंबर 2021 पासून प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला विशेष कर वसुली मोहीम ही ग्रामपंचायतीसाठी राबवली जात आहे. या वसुली दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी एकाच दिवसांमध्ये जवळपास दोन कोटी रुपायांचा भरणा केला आहे.
लातूर : शिक्षण क्षेत्रामध्ये जसा ‘लातूर पॅटर्न’ चा दबदबा आहे अगदी त्याप्रमाणेच (Grampanchayat) ग्रामपंचायतीनेही कारभारात तत्परता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नोव्हेंबर 2021 पासून प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला विशेष (tax collection) कर वसुली मोहीम ही ग्रामपंचायतीसाठी राबवली जात आहे. या वसुली दिनाचे औचित्य साधून (Latur District) लातूर जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी एकाच दिवसांमध्ये जवळपास दोन कोटी रुपायांचा भरणा केला आहे. कर वसुलीमध्ये जणूकाही स्पर्धाच लागली असल्याने ग्रामपंचायती यामध्ये सहभाग नोंदवत आहेत. यामुळे कारभारातील तत्परता आणि आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीचा सहभाग कसा वाढेल यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनीधी हे प्रयत्न करीत आहेत. कर वसुलीमध्ये निलंगा तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. एका दिवसामध्ये जिल्ह्याभरातून 1 कोटी 99 लाख 11 हजार रुपये कर भरण्यात आला आहे.
तीन महिन्यापासून मोहिमेला सुरवात
गेल्या तीन महिन्यापासून ग्रामपंचायतीकडील कर वसुली मोहीमेला सुरवात झाली आहे. अधिकची वसुली व्हावी म्हणून ग्रामविकास विभागाची यंत्रणा स्थानिक पातळीवर राबत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 76 लाख, 24 डिसेंबर रोजी 1 कोटी 49 लाख तर आता जानेवारी महिन्यात 1 कोटी 99 लाख वसुल झाल्याचे जिल्हा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायती यामध्ये सहभाग नोंदवत आहेत पण स्थानिक पातळीवरही ग्रामस्थांनी कर भरणेही तेवढेच महत्वाचे आहे. मार्च-2022 पर्यंत जर घरपट्टी,पाणीपट्टी अदा केली नाही तर नागरिकांना थेट न्यायालयाकूनच नोटीस येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या ग्रामपंचायतींचा उत्स्फुर्त सहभाग
ग्रामस्थांनी थकीत कर ग्रामपंचायतीकडे अदा करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले होते. त्यानुसार निलंगा तालुक्यातील ग्रमपंचायतीने अधिकचा सहभाग नोंदवला आहे. 24 जानेवारी रोजी उदगीर तालुक्यातील मलकापूर ग्रामपंचायतीने 7 लाख 73 हजार, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव 5 लाख 59 हजार रुपये, नळगीर (उदगीर) या ग्रामपंचायतीने 3 लाख 85 हजार तर निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, अंबुलगा बु, पानचिंचोली, नणंद, रामलिंग मूदगड, हालसी हत्तरगा, कासार बालकुंदा या ग्रामपंचायतीने 1 लाखापेक्षा जास्त कर वसुल केला आहे.
116 ग्रामपंचायतीने नोंदवला सहभाग
अमृत महोत्सव अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला वसुली मोहीम राबवली जात आहे. गेल्या तीन महिन्यापासून हा उपक्रम सुरु आहे. त्यामुळे महिन्याकाठी वसुलीचे उद्दीष्ट हे ग्रामपंचायतींना ठरवून देण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील 116 ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदवला असून मार्च 2022 पर्यंत कर अदा न केल्यास संबंधित ग्रामस्थांना न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सीईओ अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Latur: दोन वर्षात 9 लाख 50 हजार जणांच्या कोरोना चाचण्या अन् 2 हजार 461 रुग्णांचा मृत्यू
Amravati Crime | पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ
‘Srivalli’वर रील्स पाहिल्या असतील, आता भजन ऐका तेही मराठमोळ्या स्टाइलमध्ये; Video Viral