Nashik News : नाशिकच्या प्रवाशांना आज एक विचित्र अनुभव आला आहे. प्रवासी (Passenger) दिल्लीत पोहचले पण स्पाईसजेट या विमानसेवेच्या गोंधळामुळे बॅगा आणि सामान (luggage) नाशिकमध्येच राहून गेल्याची बाब समोर आली आहे. स्पाईसजेट (Spicejet) या विमानसेवेच्या कारभाराचा फटका आज प्रवाशांना बसला आहे. नाशिकहून दिल्लीत गेलेले प्रवासी हे अनेक तास आपल्या बॅगा आणि सामान घेण्यासाठी वाट बघत होते, मात्र अनेक तास उलटून गेले तरी सामान मिळत नसल्याने प्रवासी संतापले होते, त्यातच विमान सेवा प्रशासनाने सामान नाशिकलाच राहिल्याची बाब सांगितल्याने प्रवाशांचा पाराच चढला होता. खरंतर नाशिकहून दिल्ली आणि हैदराबाद या दोन ठिकाणी स्पाईसजेट या कंपनीकडून सेवा दिली जाते. कंपनीची आर्थिक परिस्थिति फारशी चांगली नसल्याने तुर्कीश विमानसेवा कंपनीशी करार केला आहे.
दरम्यान विमानाचा पायलट, क्रू मेंबर आणि इतर कर्मचारी यांच्या असमन्वयामुळे प्रवाशांना फटका बसल्याची माहिती समोर येत आहे.
असमन्वयामुळे दिल्लीकडे झेपवणारे विमान तासभर उशिरा पोहचले होते, त्यातच दीड तास वाट बघितल्यानंतर प्रवाशांना सामान नाशिकलाच राहिल्याची माहिती देण्यात आली आहे.
दिवाळीच्या काळात सुट्टी मिळाल्याने अनेकांनी पर्यटन करण्यास बाहेर पडले होते, दिल्लीत पोहचून काही प्रवासी काश्मीर आणि इतर ठिकाणी जाणार होते.
त्यात आणखी एक बाब म्हणजे यातील काही प्रवासी हे परदेशात जाणार असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
बऱ्याच वेळानंतर प्रवाशांनी आकंडतांडव केल्यानंतर उड्या तुमच्या पर्यन्त सामान पोहचू आणि आर्थिक भरपाई करून देऊ असे सांगितले आहे.
अनेक प्रवासी हे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासह विविध भागांमध्ये जाणारे होते. त्यामुळे नियोजित ठिकाणावर जायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता.