ठाणे : मीरा भाईंदरमध्ये खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारांदरम्यान नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय आणि लॅबच्या संगनमताने रुग्णांना कोरोना नसतानाही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट देऊन नागरिकांची फसवणूक सुरु होती. (Patients with mild fever reported being corona positive, filing case against lab and hospital)
मीरा भाईंदर शहर ‘कोरोनामुक्ती’कडे वाटचाल करत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ऑर्किड रुग्णालय, स्वस्तिक आणि अपूर्व लॅब लोकांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे फसवे रिपोर्ट देत असल्याची माहिती मिळाल्याने महानगरपालिकेने यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. कोरोनाच्या या संकटकाळात अशा घटना घडणे, हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे.
मीरा रोडच्या ऑर्किड रुग्णालयात रुग्णांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे येत होत्या. तक्रारीनंतर पालिका आरोग्य पथकाने अचानक रुग्णालयावर धाड टाकली तर रुग्णालयात 15 कोरोना पॉझिटिव्ह रुगणांवर उपचार सुरू होते. पालिकेने साहनिशा करण्यासाठी त्या रुग्णांच्या चाचण्या केल्या. तर 15 पैकी 13 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आढळला. परंतु बोगस रिपोर्टच्या माध्यमातून त्यांना कोरोना पॉझिटिव्ह सांगून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
ऑर्किड रुग्णालयाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, रुग्णांचे कोव्हिड स्वॅब टेस्ट स्वस्तिक लॅब यांच्यामार्फत तपासणीसाठी अपूर्व लॅब मीरारोड येथे पाठवले जातात. ऑर्किड, स्वस्तिक रुग्णालय आणि अपूर्व लॅब यांच्या गैरकारभाराबाबत नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी, बॉम्बे नर्सिंग होम अधिनियमान्वये रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.
या रुग्णालयांचा कोव्हिड उपचारांसाठी असलेली मान्यता, तसेच परवानाही रद्द करण्यात आला आहे. बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील ऑर्किड रुग्णालयाने सांगितले की सर्व कागदपत्र असतानाही पालिकेकडून चुकीची कारवाई करण्यात आलेली आहे. मनपा आरोग्य विभागाने रुग्णालय विरोधात षडयंत्र रचलं आहे.
इतर बातम्या
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोनाबळींची संख्याही घसरली
Thane Unlock | ठाणे शहर आणि जिल्ह्यात नेमकं काय सुरु काय बंद, नवी नियमावली नेमकी काय?
(Patients with mild fever reported being corona positive, filing case against lab and hospital)