मोदी पंतप्रधान नव्हे प्रचारक, युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी बेपत्ता, तरीही स्वतःची पाठ थोपटतात; पटोलेंची टीका

नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाईंबद्दल केलेले विधान चुकीचे आहे. महाराष्ट्राला न शोभणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून लाभलाय. छत्रपतींचा अपमान होतो आणि भाजप त्याचे समर्थन करते हे चुकीचे आहे. अशा व्यक्तीला भाजप राज्यपाल बनवणार असेल, तर काँग्रेस त्याचा विरोध करेल.

मोदी पंतप्रधान नव्हे प्रचारक, युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी बेपत्ता, तरीही स्वतःची पाठ थोपटतात; पटोलेंची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नाना पटोले
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 4:09 PM

मुंबईः नरेंद्र मोदी पंतप्रधान नाहीत, ते प्रचारक आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. त्यात एअर इंडियाने रेट वाढवला. 20 हजार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना 80 किलोमीटर चालावे लागले. अनेक जण बेपत्ता आहेत. मात्र, तरीही पंतप्रधान स्वतःची पाठ थोपटणार असतील, तर ते चुकीचे आहे, अशी जहरी टीका रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज पुणे (pune) दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) उद्घाटन केले. यावेळी बोलताना युद्धात अडकलेल्या युक्रेनमधील नागरिकांना मायदेशी आणण्यात इतरांना अडचणी येत आहेत. मात्र, भारताने ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून ते करून दाखवलं, असा दावा त्यांनी सिम्बॉयसिस कॉलेजमधील कार्यक्रमात केला. या वक्तव्याचा पटोले यांनी जोरदार समाचार घेतला.

न शोभणारी व्यक्ती राज्यपाल

नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाईंबद्दल केलेले विधान चुकीचे आहे. महाराष्ट्राला न शोभणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून लाभलाय. छत्रपतींचा अपमान होतो आणि भाजप त्याचे समर्थन करते हे चुकीचे आहे. अशा व्यक्तीला भाजप राज्यपाल बनवणार असेल, तर काँग्रेस त्याचा विरोध करेल. राज्यपालांबद्दल देखील गो बॅकचे नारे लावायला मागे पुढे पाहणार नाही. पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान नाहीत, ते प्रचारक आहेत. एअर इंडियाचा रेट वाढवला. 20 हजार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना 80 किलोमीटर चालावे लागले. अनेक जण बेपत्ता आहेत. पंतप्रधान स्वतःची पाठ थोपटणार असतील, तर ते चुकीचे आहे.

भाजप ओबीसींचा शत्रू

नाना पटोले म्हणाले की, भाजप ओबीसी समाजाचा शत्रू आहे. आपल्यावरचे आरोप मविआवर ढकलत आहे. 2011 मध्ये मनमोहन सिंह यांनी इम्पिरीकल डाटा गोळा करून ठेवलाय. मात्र, तो डाटा देत नाहीत, ना उत्तर देतात. त्यामुळे अनेक त्रुटी राहतात. मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात हा प्रश्न निर्माण झालाय. भाजपला एक प्रश्न आहे की, केंद्राने हस्तक्षेप केला, तर हा प्रश्न सुटू शकतो. मात्र, भाजपला आरक्षण द्यायचे नाही. सोबतच एससी, एसटी आरक्षण देखील संपवण्याचा घाट आहे. मंडल आयोगाच्या शिफारशी रद्द करायचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शुक्लांवर 500 कोटींचा दावा करणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी पुणे आयुक्त असताना माझे धंदे दाखवले. माझी बदनामी करण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील माझी बदनामी झाली. आता मी त्यांच्यावर 500 कोटींचा दावा करणार आहे. तत्कालीन गृहमंत्र्यांना देखील माफ करता येणार नाही. देवेंद्र फडणवीस, रश्मी शुक्ला जे कोणी असतील. अशात मुख्य आरोपी रश्मी शुक्ला आहेत. हा आरोपाचा भाग नाही. तुमच्या माध्यमातून मला कळले. शासनाच्या देखील निदर्शनात आले आहे की, मुख्य आरोपी रश्मी शुक्ला आहेत. जी नावे पुढे आहेत त्याबद्दल देखील पुढे कारवाई करू.

धारावी घोटाळ्याची चौकशी करा

पटोले म्हणाले की, मुंबईतील धारावी झोपडपट्टीचे पुनर्वसन व्हावे हे स्वप्न होते. मात्र, त्याला भष्ट्राचाराचे गालबोट लागले आहे. रेल्वेच्या 45 एकर जागेसाठी 800 कोटी फडणवीसांनी दिले. मात्र, अद्याप काहीही झालेले नाही. रेल्वे जागा देण्यास तयार नाही, ना ते पैसे परत द्यायला तयार नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. शहराला घाण करण्याचे काम भाजप करते आहे. याबाबत या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. धारावी घोटाळा प्रकरणी उद्देश काय होता? यासाठी एसआयटी चौकशीची करावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. सोबतच ईडी, सीबीआयनेही चौकशी करावी.

2024 नंतर विलीनीकरणावर भूमिका घेणार

नाना पटोले म्हणाले की, एसटीच्या विलीनीकरणावरचा अहवाल आला आहे. मात्र, भाजप आंदोलकांच्या मागे राहून कामगारांना उपाशी ठेवण्याचे काम करत आहे. त्यांची सत्ता असताना विलीनीकरण केले नाही. आज विलीनीकरणाची परिस्थिती नाही. मात्र, 2024 नंतर आम्ही कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. विलीनीकरणासंदर्भातली भूमिका ठामपणे मांडू.

इतर बातम्याः

Video | पंतप्रधान मोदींचा दिव्यांगांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास; दिलखुलास गप्पांचा फडही रंगला…!

नागपूरची मेट्रो वेगाने झाली, पिंपरी-ठाणेसाठी मदत करा; अजित पवारांची मोदींना राजकारण न करण्याची ग्वाही

पुणे महापालिकेत येणारे मोदी दुसरे पंतप्रधान; यापूर्वी नेहरूंचे 2 दौरे, काँग्रेस नेत्याने फोटोच दाखवला!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.