औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबाद(Aurangabad) येथील सभा चर्चेत आली होती ती पेढेतुला(Pedhetula ) यामुळे. सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांची पेढेतुला करण्याचा घाट कार्यकर्त्यांनी घातला होता. या पेढेतुला दरम्यान एका मिनिटात 100 किलो पेढे गायब झाले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा चांगलाच चर्चेत आलाय. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभा घेतली.
मात्र, याआधी मुख्यमंत्र्यांची पेढेतुला होणार होती. या पेढेतुला मधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालाय.
औरंगाबादमधील बिडकीन येथे शिंदे यांच्या ‘पेढे तुला’चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पेढेतुला नाकारली. मग, येथे पेढेतुला करण्यासाठी ठेवलेले पेढे अवघ्या एका मिनीटांत गायब झाले.
मुख्यमंत्र्यांनी पेढेतुला नाकारल्यानंतर पेढेतुला करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पेढ्यांवर येथे उपस्थित असलेले लोक तुटून पडले.
लोकांनी 110 किलो लाडू आणि 100 किलो पेढे अवघ्या एका मिनिटात गायब केले. पेढे आणि लाडू मिळवण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.
व्हायरल व्हिडिओ मध्ये लोक अक्षरश: लाडू आणि पेढ्यांवर तुटून पडल्याचे दिसत आहे. गर्दीमुळे येथे काही गोंधळ निर्माण झाला होता.