गुजरातमधील पेट्रोल पंपांवर महाराष्ट्रातील लोकांचीच गर्दी जास्त
नंदूरबार जिल्हापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोल 96.99 रुपये तर डिझेल 89 रुपये दर आसल्याने नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक नागरिक गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी जात आहेत.
देशातील पाच राज्यातील निवडणूक संपल्यानंतर पेट्रोल (Petro) आणि डिझेलच्या (Diesel) दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात 110.91 रुपये पेट्रोलचे दर आहेत तर डिझेलचे दर 94.69 पैसे आहेत. नंदूरबार जिल्हापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोल 96.99 रुपये तर डिझेल 89 रुपये दर आसल्याने नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक नागरिक गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी जात आहेत. गुजरातमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील महाराष्ट्र राज्यामधील पेट्रोल पंप ओस पडलेले असल्याचे चित्र दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वाहनधारक मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गुजरात राज्याला पसंती देत आसल्याने दिसून येत आहे. दरम्यान, वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत.