मोदींची गॅरंटी खोटी निघाली, लोकांच्या विश्वासाला तडा – शरद पवार

महाराष्ट्रात आणि देशात असं दिसतंय की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाहीये, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.

मोदींची गॅरंटी खोटी निघाली, लोकांच्या विश्वासाला तडा - शरद पवार
शरद पवार
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 10:18 AM

महाराष्ट्रात आणि देशात असं दिसतंय की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाहीये, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीकास्त्र सोडलं. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपची महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली आणि केंद्रातही स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नसून एनडीएचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही सरकारचे कान टोचण्यात आले होते.

राज्यात महाविकास आघाडीला चांगली मत आणि जागा मिळाल्या. त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, शरद पवार यांनी लोकांचा मोदींवर, सरकारवर विश्वास उरला नसल्याचे नमूद केले. मोदींनी जी आश्वासनं दिली होती ती गेल्या 5-10 वर्षांत त्यांनी पाळली नाहीत हे लोकांच्या लक्षात आलं. आणि लोकांना बदल हवाय, त्यामुळे राज्यात हे चित्र दिसलं असं पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत लोकांचा मूड काय हे स्पष्ट झालं

या लोकसभा निवडणुकीत तुम्ही बघितलंत तर राज्यात आम्ही (मविआ) 30-31 जागा जिंकल्या. विधानसभेचं जर तुम्ही पाहिलं तर 155 मतदारसंघामध्ये आम्हा लोकांचा विजय झालेला आहे. 288 जागांची विधानसभा , त्यातला 155 मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळतं, याचा अर्थ भविष्यात विधानसभा निवडणुकीत लोकांचा मूड काय हे स्पष्ट होतं. त्यादृष्टीने पावलं टाकणं ही आमची जबाबदारी आहे, असंही पवार म्हणाले.

भुजबळांशी संपर्क नाही

मी राष्ट्रवादी सोबत आहे, अजित दादांसोबत नाही, या छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने आणि त्यांचा सध्याच्या एकंदर भूमिकेमुळेच ते शरद पवार गटासोबत पुन्हा जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा, याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं.

त्यांच्या या विधानामागची पार्श्वभूमी काय हे मला माहीत नाही. माझी त्यांची वर्ष-सहा महिन्यांत भेट नाही. त्यामुळे त्यांच्या विधानबद्दल मला काही माहीत नाही असे शरद पवार म्हणाले. त्यांच्याकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आधी लोकसभा नतर राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून भुजबळांचं पुढलं पाऊल काय असेल याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.