राज्यात ‘कोरोना’चं थैमान, पाळीव प्राण्यांनाही ‘कोरोना’चा फटका
अनेक लोक कुत्र्यांसह घरातील पाळीव प्राण्यांना घरात ठेवण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागला (Corona Affect on pet) आहे.
अमरावती : कोरोना व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (Corona Affect on pet) जाहीर केलं आहे. मात्र अनेक लोक कुत्र्यांसह घरातील पाळीव प्राण्यांना घरात ठेवण्यास नकार देत आहेत. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागला आहे. याच गोष्टींचे परिणाम लक्षात घेता अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचे संचालक समीर जनवंजाळ यांनी एक भावनिक आवाहन केले आहे. कोणीही आपले पाळीव प्राणी बाहेर रस्त्यावर किंवा जंगलात न सोडता आम्हाला दत्तक द्या. आम्ही त्याना पोसतो असे समीर जनवंजाळ यांनी सांगितले आहे.
प्राण्यांना पोसणे, सांभाळणं फार खर्चीक (Corona Affect on pet) गोष्ट आहे. प्राण्यांमुळे अनेक आजार होतात असे सांगितले जाते. त्यातच आता तर कोरोना व्हायरसचं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे अनेक जण या सर्व पाळीव प्राण्यांना जंगलात किंवा इतर ठिकाणी सोडत आहे. त्यामुळे हे पाळीव प्राणीसुद्धा बेघर होत आहे. या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर न सोडता मला दत्तक द्या असे आवाहन अमरावतीमध्ये करण्यात येत आहे.
कुणा व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात आल्यास त्या व्यक्तीला इतरांपासून वेगळं ठेवलं जातं. त्यामुळे त्याने समजा कुत्रा किंवा इतर प्राणी पाळला असेल, तर त्याच्यावर बेघर होण्याची वेळ येते. या आवाहनानंतर आता अनेक जण आपले पाळीव प्राणी समीर यांच्याकडे विश्वासाने आणून देत आहे.
सध्या वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळते आहे. प्राण्यांपासून हा रोग पसरत असल्याची माहिती सगळीकडे पसरली आहे. त्यामुळे आता काही लोकांनी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर काढले जात आहे. अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपच्या संचालक समीर जनवंजाळने उचलले पाऊल अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्याचे कौतुक केलं जातं (Corona Affect on pet) आहे.
संबंधित बातम्या :
Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी
Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना
महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत
CORONA : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण