जनतेने खेटर हातात घेऊन जागा दाखवली, धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
बीड : भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी 1 लाख 69 हजार 67 मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला. प्रीतम मुंडेंना एकूण 6 लाख 78 हजार 175 मते मिळाली. बीडमध्ये तब्बल 36 उमेदवार रिंगणात होते. चुरशीची लढत होईल अशी शक्यता असताना प्रीतम मुंडेंनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि पावणे दोन लाखांनी विजय मिळवला. […]
बीड : भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी 1 लाख 69 हजार 67 मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला. प्रीतम मुंडेंना एकूण 6 लाख 78 हजार 175 मते मिळाली. बीडमध्ये तब्बल 36 उमेदवार रिंगणात होते. चुरशीची लढत होईल अशी शक्यता असताना प्रीतम मुंडेंनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि पावणे दोन लाखांनी विजय मिळवला. त्यांच्या मताधिक्यामध्ये सर्वाधिक वाटा हा भाजपचे विधानसभा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघाचा आहे. या मतदारसंघात सध्या भाजपचे भिमराव धोंडे विधानसभेवर आमदार आहेत. या विजयानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.
या जिल्ह्यातल्या काही नेत्यांना गुलालाची एलर्जी आहे. त्यांना अगोदरच बुक्का आणायचा सल्ला दिला होता. जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंनी केलेल्या कामावर लोकांनी विश्वास ठेवला आणि हा विजय मिळवलाय. राष्ट्रवादीच्या पक्षविरोधी नेत्याने पोरकटपणाचं लक्षण या जिल्ह्यात केलंय. सोशल मीडियावर फक्त जातीवादाचं विष कालवायचं काम केलं. याला चपराक हा शब्दही कमी पडणार आहे. बीड जिल्ह्याने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता खेटर हातात घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला.
ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशावरही सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीत कानफुके आहेत, त्यांनी या जिल्ह्यात ज्येष्ठ माणसं ठेवायची नाही हे ठरवलंय. जयदत्त अण्णा नको, सुरेश धस नको हे ठरलंय त्यांचं. पण मुंडे साहेबांना मानणारा मोठा मतदार आहे, तो मतदार कुठेही हरत नाही. मुंडे साहेबांचंही रेकॉर्डही त्यांच्या मुलीने मोडलंय. साहेब 1 लाख 36 हजार मतांनी जिंकले होते, ताई पावणे दोन लाखांनी जिंकल्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विधानसभा मतदारसंघ निहाय मिळालेले मतदान
बीड विधानसभा
भाजप : 96388
राष्ट्रवादी : 92565
मताधिक्य : 5823
केज विधानसभा
भाजप : 116229
राष्ट्रवादी : 95293
मताधिक्य : 20936
माजलगाव विधानसभा
भाजप : 100166
राष्ट्रवादी : 83293
मताधिक्य : 16907
परळी विधानसभा
भाजप : 96049
राष्ट्रवादी : 77269
मताधिक्य : 18980
आष्टी विधानसभा
भाजप : 148110
राष्ट्रवादी : 77797
मताधिक्य : 70313
गेवराई विधानसभा
भाजप : 119169
राष्ट्रवादी : 84704
मताधिक्य : 34465
नोटा : 2490
पोस्टल मतदान
भाजप : 2334
राष्ट्रवादी : 699
एकूण मतदान (पोस्टलसह)
भाजप : 6 लाख 78 हजार 175
राष्ट्रवादी : 5 लाख 9 हजार 807
एकूण मताधिक्य : 1 लाख 68 हजार 368
व्हिडीओ :