संभाजी भिडेंच्या बैठकीला परवानगी नाकारली, कोरोना संसर्गाचे कारण देत निर्णय
रायगडवरील सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा याबाबत आयोजित करावयाच्या संभाजी भिडे यांच्या बैठकीला परवानगी नाकारण्यात आली आहे. (Shivpratishthan meeting corona pandemic)
कोल्हापूर : रायगडवरील सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा याबाबत आयोजित करावयाच्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide )यांच्या बैठकीला परवानगी नाकारण्यात आली आहे. ही बैठक वेळापत्रकानुसार करवीर तालुक्यातील वडणगे या गावात होणार होती. विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानमध्ये (Shivpratishthan) फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच बैठकीचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, कोरोना संसर्गाचे कारण देत या बैठकीला परवानगी नाकारण्यात आली आहे. (permission for meeting of Shivpratishthan has been cancelled due to corona pandemic)
बैठकीला परवानगी नाही
संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानतर्फे रायगडावर सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा या विषयांवर एक बैठक होणार होती. करवीर तालुक्यातील वडणगे या गावात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व होते. मात्र, सध्या राज्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना संसर्ग गावपातळीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शिवप्रतिष्ठानच्या या बैठकीला प्रशासनातर्फे परवानगी नाकारण्यात आली.
शिवप्रतिष्ठानमध्ये फूट
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून देशभर ओळखली जाते. संभाजी भिडे यांची संघटना म्हणून या संघटनेची खरी ओळख आहे. भिडे गुरुजींच्या आदेशावर चालणाऱ्या या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत शिवप्रतिष्ठानची भरभक्कम, अशी ओळख आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मागील 20 वर्षांपासून शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक म्हणून काम पाहणारे नितीन चौगुले यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिष्ठान संघटनेतील कलह समोर आला. 5 फेब्रुवारी रोजी शिवप्रतिष्ठानकडून राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून नितीन चौगुले यांना निलंबत करत काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, रायगडवरील सुवर्ण सिंहासन, खडा पहारा यासोबतच शिवप्रतिष्ठानची पुढची दिशा कोणती?, गृहकलाबाबतची भूमिका या सर्व गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रशासनाने या बैठकीला परवानगी न दिल्यामुळे शिवप्रतिष्ठानची काय भूमिका असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :