Petrol Diesel Price : ‘आधी किंमती वाढवायच्या नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको’, मुख्यमंत्र्यांचा पलटवार, इंधन दरावरुन राज्याच्या राजकारणात भडका

आधी किंमती वाढवायच्या नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) केंद्रावर केली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Petrol Diesel Price : 'आधी किंमती वाढवायच्या नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको', मुख्यमंत्र्यांचा पलटवार,  इंधन दरावरुन राज्याच्या राजकारणात भडका
'आधी किंमती वाढवायच्या नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको', मुख्यमंत्र्यांचा पलटवार, इंधन दरावरुन राज्याच्या राजकारणात भडकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 8:47 PM

मुंबई : काही वेळापूर्वीच केंद्राने  पेट्रोल 9.5 रु, डिझेल 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) स्वस्त होणार असल्याची घोषणा केली. तर घरगुती गॅस सिलिंडरवरही (Gas Cylinder Price) 200 रुपये सबसिडी जाहीर केली. मात्र त्यावरून लगेच राज्यात राजकारणाचा भडका उडाला कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी यावरून राज्याला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र काही वेळातच शिवसेनेच्या भात्यातून पहिला बाण सुटला आणि थेट मुख्यमंत्र्यांनीच यावरून केंद्रावर जोरदार पलटवार केला. आधी किंमती वाढवायच्या नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) केंद्रावर केली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

नाममात्र दर कमी केले

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी कर देखील 18 रुपये 24 पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.

हे सुद्धा वाचा

फडणवीस म्हणतात आता तुमची बारी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील यांचीही राज्याकडे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करून देशातील जनतेला मोठा दिलासा दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण पंतप्रधान मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा मोदी सरकारप्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर महाराष्ट्रात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही आपण करतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.