भर दिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार?, छे छे… कोर्टाने काय नोंदवलं निरीक्षण?
भरदिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार करणे अविश्वनीय असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला आहे. सदैव गजबजलेल्या जुहू चौपाटीवर आरोपीने पीडितेला नेले आणि भरदिवसा तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.
भरदिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार करणे अविश्वनीय असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला आहे. सदैव गजबजलेल्या जुहू चौपाटीवर आरोपीने पीडितेला नेले आणि भरदिवसा तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला. मिळालेल्या माहितीनुसार, याचिकाकर्ता इसम हा 2021 सालापासून जेलमध्ये असून या प्रकरणी अद्याप आरोप निश्चिती झालेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर याचिकाकर्ता इसम जामीन मिळण्यास पात्र आहे, असे नमूद करत न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने जामीन मंजूर केला.
मात्र या प्रकरणातील पीडित तरूणीचे वय हे 19 वर्षांपेक्षा जास्त आणि 20 वर्षांहून कमी असल्याचे निदान झाल्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गतच्या तरतुदीनुसार याचिकाकर्त्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती चव्हाण यांच्या एकलपीठाने आदेशात स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ओशिवरा येथे घरकाम करत होती. त्याचदरम्यान पीडितेची ओळख सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या इसमाशी झाली ( तोच याचिकाकर्ता आहे.). थोड्या दिवसांनी त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ही घटना ज्या दिवशी घडली( 14 मे 2021) ईद होती. त्या दिवशी याचिकाकर्ता इसम हा पीडितेला जुहू चौपाटीवर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली मात्र पीडितेने त्या गोष्टीस नकार दिला. या नकाराचा राग आल्याने त्याने पीडितेला धमकावून किनाऱ्यावर असलेल्या मोठ्या दगडांच्या मागे नेले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला, असा आरोप आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी याचिकाकर्त्यावर भारतीय दंड संहितेनुसार बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पोक्सो) गुन्हा दाखल केला होता. मात्र जी जुहू चौपाटी नेहमीच गजबजलेली असते आणि त्या चौपाटीवर ईदसारख्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणखी गर्दी असताना याचिकाकर्त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असा पुनरूच्चार करत न्यायालयाने याचिकाकर्त्या इसमाला जामीन मंजूर केला.