पिंपरी चिंचवडचे कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांची बदली
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झालेली आहे. त्यांच्या जागी आता राजेश पाटील महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. | Shravan Hardikar Transfer
पिंपरी चिंचवड : गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या बदली संदर्भात सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकपदी हर्डीकर यांची बदली झाली असून गेली पावणे चार वर्षे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. हर्डीकर यांच्या जागी राजेश पाटील यांची महापालिकाचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Pimari Chinchavad palika Commissionor Shravan Hardikar Transfer)
कोरोना काळात हर्डीकर यांचं उत्तम काम
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत आयुक्त म्हणून गेले पावणे चार वर्षे हर्डीकर यांनी काम पाहिले. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळेपासून हर्डीकर यांच्या बदलीची चर्चा रंगू लागली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हर्डीकर यांची तत्काळ बदली होईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांची बदली लांबणीवर पडली.
हर्डीकर यांनी शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. कोरोना काळात त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नियमाच्या अधिन राहून काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांची ओळख…
स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश पाटील यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. 2005 मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना 2008 मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे.
राजेश पाटील यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे. दरम्यान आता ते पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून कारभार पाहणार आहेत.
(Pimari Chinchavad palika Commissionor Shravan Hardikar Transfer)
हे ही वाचा :
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये, पूजा चव्हाण प्रकरणाची घेतली माहिती; राठोडांवर कोणत्याही क्षणी कारवाई?
मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!