पिंपरीत 5, नगरमध्ये एका ‘कोरोना फायटर’ला डिस्चार्ज, नर्स-डॉक्टरांकडून टाळ्यांच्या कडकडाटात निरोप
'कोरोना'शी यशस्वी सामना केल्याने रुग्णालयाचे डॉक्टर आणि स्टाफने टाळ्या वाजवत बुके देऊन कोरोनामुक्त रुग्णाचे अभिनंदन केले. (Pimpari Ahmednagar Corona Discharge)
पिंपरी चिंचवड/अहमदनगर : पिंपरी चिंचवडमध्ये आज आणखी पाच कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर अहमदनगरमधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णालाही डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या या रुग्णांना रुग्णालयातील नर्स, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून निरोप दिला. (Pimpari Ahmednagar Corona Discharge)
पिंपरी चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज केलेले तीन आणि आजचे पाच अशा एकूण 8 ‘कोरोनामुक्त’ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात कोरोनाचे एकूण 12 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 4 रुग्णांवर आता उपचार सुरु आहेत.
उर्वरित चौघांपैकी एकाला 15 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्या रुग्णाची 14 दिवसानंतर होणारी चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आली असून दुसऱ्या चाचणीसाठी नमुने आज पाठवले आहेत. या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला, तर त्या ‘कोरोना’बाधिताला ‘कोरोनामुक्त’ जाहीर करुन उद्या डिस्चार्ज दिला जाईल.
पिंपरी चिंचवडमध्ये डिस्चार्ज मिळालेले तिन्ही रुग्ण पुण्याच्या रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेल्या दाम्पत्यासोबत दुबईला गेले होते. पुण्यातील दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील या रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, तेव्हा या तिघांनाही ‘कोरोना’चे निदान झाले होते.
अहमदनगरमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त
दरम्यान, अहमदनगरमधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णालाही डिस्चार्ज मिळाला आहे. ‘कोरोना’शी यशस्वी सामना केल्याने रुग्णालयाचे डॉक्टर आणि स्टाफने टाळ्या वाजवत बुके देऊन रुग्णाचे अभिनंदन केले. 14 दिवसानंतर पहिला कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाला. अहमदनगरमध्ये एकूण 3 कोरोनाबधित रुग्ण होते. त्यातील 1 कोरोनामुक्त झाल्याने आता नगरमध्ये 2 कोरोनाबधित रुग्ण आहेत. (Pimpari Ahmednagar Corona Discharge)
आयसोलेशन वॉर्डच्या बाहेर आल्यानंतर संबंधित रुग्णाचे पुष्पगुच्छ देऊन बुथ हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत त्याला निरोप दिला.
‘जवळपास दोन आठवड्यांपासून मी बूथ हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये आहे. जिल्हा प्रशासनाने माझी अतिशय व्यवस्थित काळजी घेतली. माझ्याकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष दिले. कोरोनाला घाबरून जाऊ नका. हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. आपणच आपली काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.’ अशा भावना कोरोनामुक्त रुग्णाने व्यक्त केल्या.
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
कोरोनाचं थैमान सुरुच, महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 193 वरhttps://t.co/QfbJEg69B9#CoronaUpdates #CoronaVirus #CoronaInfection
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2020
(Pimpari Ahmednagar Corona Discharge)