अजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते
शेतीची कामे सुरु असताना पेट्रोल पंप चालक डिझेल देत नाहीत, अशी तक्रार करणारा फोन संजय पवार यांनी अजित पवारांना केला. (Pimpari Sanjay Pawar calls Ajit Pawar)
पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे झटपट निर्णय हे आपण अनेकदा ऐकलं आहे. सध्या सर्वांवर ओढवलेल्या ‘कोरोना’च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. युवासेनेचे शिरुर तालुका प्रमुख संजय पवार यांचं काम एका फोनसरशी झालं. (Pimpari Sanjay Pawar calls Ajit Pawar)
शेतीची कामे सुरु असताना पेट्रोल पंप चालक डिझेल देत नाहीत, अशी तक्रार करणारा फोन संजय पवार यांनी अजित पवारांना केला. त्यावर लगेचच ‘कोण देत नाही डिझेल? दे बरं फोन त्याला’ अशी आवाजातील जरब अजितदादांनी दाखवली आणि पेट्रोलपंप चालकांनी गपगुमान डिझेल दिलं.
अजित पवार आणि संजय पवार यांची ही क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे
संजय पवार : दादा, संजय पवार बोलतोय. युवासेना शिरुर तालुकाप्रमुख
अजितदादा : बोला
संजय पवार : दादा, प्रॉब्लेम काय झालाय. काल थोडा अवकाळी पाऊस झाला ना आणि आता सगळ्यांचे गहू काढायला आलेत आणि गव्हाच्या हार्वेस्टिंगला पेट्रोल पंपवाले डिझेल देईनात.
अजितदादा : अहो, मी आता पुण्याच्या एसपी, कलेक्टर यांना सांगितलेले आहे. मशिनला डिझेल-पेट्रोल द्यायला. शेतकऱ्यांच्या कामाला डिझेल पेट्रोल द्यायला सांगितले आहे.
संजय पवार : ओके दादा चालेल. (Pimpari Sanjay Pawar calls Ajit Pawar)
अजितदादा : कोण देत नाही? द्या बरं फोन
संजय पवार : नाही आता आम्ही हिकडं आलोय. पंपावर पोलिस बंदोबस्त आहे.
अजितदादा : अहो, द्या ना कोण देत नाही. बघतो मी पण.
संजय पवार : तिथं गेलं की मी फोन करतो तुम्हाला दादा.
हेही वाचा : पोलिस, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले केलेत, तर…; अजित पवारांचा दम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आलीय.यामुळे राज्यातली मालवाहतूक पुन्हा सुरू होईल.जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडवण्यात येणार नाही.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 26, 2020
(Pimpari Sanjay Pawar calls Ajit Pawar)