Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन् पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पत्रकारांवर भडकले!

आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पत्रकारांवर भडकले

अन् पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पत्रकारांवर भडकले!
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 6:53 PM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आज एका पत्रकारावर भडकल्याचं पाहायला मिळालं! गोळीबार हा पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने झाला हे तपासात स्पष्ट झालं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश चांगलेच भडकले. तुम्ही पत्रकार नियोजनबद्ध कट रचून आलेला आहात. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. इतकी चांगली आणि कठोर कारवाई करुनही तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला कुणी असे प्रश्न विचारा म्हणून नियोजन करुन पाठवले आहे का? असा प्रश्न विचारतानाच मी जे बोलतो तेच करतो, असा दावा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलाय. (Pimpri-Chinchwad CP Krishna Prakash shouted at reporters)

आरोपी तानाजी पवारकडून गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेचा शोध होता. अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची 3 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय.

नेमकी तक्रार काय?

पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी रॉड सारख्या घातक शस्त्राने दोन जणांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि त्यांच्या पीएसह 10 जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

अण्णा बनसोडे गोळीबारातून वाचले

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार 12 मे रोजी गोळीबार झाला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

कोण आहेत अण्णा बनसोडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापूर्वी ते 2009 मध्येही निवडून आले होते. नंतर 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांचा शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केला होता.

संबंधित बातम्या :

आमदार आण्णा बनसोडेंच्या मुलासह 4 आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी, आतापर्यंत 13 आरोपींना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

Pimpri-Chinchwad CP Krishna Prakash shouted at reporters

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.