PM Modi : पालखी मार्ग ते बाबासाहेब, वीर सावरकर, नरेंद्र मोदींच्या देहु दौऱ्यातल्या भाषणातले 10 मोठे मुद्दे

. देहूत पांडुरंगांचा निवास आहे, आमि प्रत्येक जण भक्तीने ओतपोत संत स्वरुप आहे. म्हणून नागरिक, माता, भगिनींना नमन करतो. असे म्हणतांनाच मोदींनी पालखी मार्गाच्या चौपदरीकरणापासून ते स्वातंत्र्यावीर सावरकर  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पंचतिर्थ अशा सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं. 

PM Modi : पालखी मार्ग ते बाबासाहेब, वीर सावरकर,  नरेंद्र मोदींच्या देहु दौऱ्यातल्या भाषणातले 10 मोठे मुद्दे
पंतप्रधान मोदींनी केली मंदिराची पाहणी Image Credit source: ani
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 3:23 PM

पुणे : देशाचे पंतप्रधान (Pm Modi) मोदी आज पुण्यात होते, देहूतील (Dehu) कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आहे. यात आपल्या भाषणाची सुरूवात मोदींनी, श्री विठ्ठलाय नम, नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदिपा.. नमो भास्करा ज्ञानमूर्ती. असे म्हणत केली. त्यानंतर  मस्तक या पायावरी या संताच्या.. संतांची अनूभूती झाली तर इश्वराची अनुभूती होते. देहूच्या तीर्थक्षेत्रावर येण्याचं सौभाग्य मिळालं, आणि मी हाच अनुभव घेतो आहे. देहू संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. देहूत पांडुरंग नांदतो. देहूत पांडुरंगांचा निवास आहे, आमि प्रत्येक जण भक्तीने ओतपोत संत स्वरुप आहे. म्हणून नागरिक, माता, भगिनींना नमन करतो. असे म्हणतांनाच मोदींनी पालखी मार्गाच्या चौपदरीकरणापासून ते स्वातंत्र्यावीर सावरकर  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पंचतिर्थ अशा सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं.

  1. काही दिवसांपूर्वी पालखी मार्ग फोर लेन करण्यासाठी उद्घाटन करण्याचा मान मिळाला. तीन चरणात काम पूर्ण होईल. 350 किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे होतील. 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहोत,. या क्षेत्राता विकास होईल, असे मोदींनी सुरूवातील सांगितले.
  2. तसेच ज्या शिळेवर तुकाराम महाराांनी 13 दिवस तपस्या केली असेल, ती शीळा फक्त शीळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शीळा आहे. या क्षेत्राच पुननिर्माण करण्यासाठी आभार व्यक्त करतो. संताजी जगदाडे यांनाही नमन करतो. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. जगातील प्राचीन सभ्येततील एक आहोत. याचे श्रेय संत आणि ऋषिंना . भारत शाश्वत आहे कारण संतांची भूमी आहे, असेही मोदी म्हणले.
  3. देशातील संतसंस्कृतीबाबत बोलताना मोदी म्हणाले, प्रत्येकवेळी मार्गदर्शनसाठी इथे सत्परुष जन्माला आले आहेत. संत ज्ञानेश्वर समाधींचे 725 वर्ष आहे. यांच्यामुळेच भारत गतीशील आहे. बहिणाबाईंनी संत तुकारामांना संतांचे कळस म्हटले आहे. तुकारामांनी दुष्काळ पाहिला, दुख पाहिले, भूकबळी पाहिले. संत तुकाराम त्यावेळी समाजासाठीच नव्हे तर भविष्यासाठी प्रकाश म्हणून राहिले. ही शीळा त्यांच्या वैराग्याची साक्ष आहे. तुकरामा दया आणि करुणेचा ठेवा अभंगांत आहे. या पिढ्यांनी पीढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही तोच अभंग. आजही देश जेव्हा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जातोय, त्यावेळी तुकारामांचे अभंग प्रेरणा, दिशा देतात. सर्व संतांच्या अभगांनी प्रेरणा मिळते. सार्थ अभगं गाथांनी संत परंपरेचे ५०० अभंग रचना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत, असे म्हणत मोदींनी संत संस्कृतीवर भाष्य केलं आहे.
  4. संत तुकाराम म्हणत उच्च-नीचचा भेदभाव करणे हे पाप आहे. हा उपदेश तितका उपयुक्त धर्मासाठी तितकाच राष्ट्रभक्तीसाठीही आहेच. हाच संदेश घेऊन वारकरी दरवर्षी वारी करतो. त्यातूनच सरकारच्या योजनांचा विना भेदभाव सगळ्यांना मिळतो आहे. असे म्हणत त्यांनी याही मुद्द्यावर भाष्य केले आहेत.
  5. तर जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणजे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकारामांचा अभंग, जेव्हा तुम्ही शेवटच्या रांगेत बसलेल्यांचा विकास करणे, हाच अंत्योदय आहे. समाजातील सर्वात खालच्या स्तरातील सगळ्यांचे कल्याण हाच उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुषअयात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे, असे म्हणत मोदींनी अभंगाचा अर्थही समजावून सांगिताल आहे.
  6. वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते तुकारामांचे अभंग गात असत. वेगवेगळ्या पिढीला तुकारामांचे अभंग प्रेरणा राहिलेल्या आहेत. त्यांनी आपल्या बेड्यांच्या चिपळ्या केल्या, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणात सावरकरांचाही उल्लेख केला आहे.
  7. तर म्हणूनच नेती नेती असे म्हटले जाते. आषाढात पंढरपूर यात्रा आता सुरु होणार आहे, हा यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यित ठेवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत. अयोध्येत राममंदिरही होते आहे. काशी विश्वनाथ स्वरुप बदलले आहे. सोमनाथमध्येही चांगले कार्य झाले आहे. तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांचा विकास केला जातोय. रामायण सर्किट, बाळासाहेब आंबेडकर पंचतीर्थांचाही विकास होतो आहे, असे म्हणत त्यांनी तीर्थक्षांच्या आणि पर्यटनस्थळांच्या विकास कामांबाबत माहिती दिली आहे.
  8. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे.. योग्य दिशेने प्रयत्न केले तर असंभवही संभव होऊ शकेल. गरिबांसाठी योजना सरकार राबवते आहे. 100 ट्क्कयांपर्यंत त्या पोहचावयच्या आहेत. पर्यावरण, जलसंवर्धन, नद्यांसाठी प्रयत्न, स्वस्थ भारत हा संकल्प, 100 टक्के पूर्ण करायचे आहे. सगळ्यांच्या सहभागाची गरज आहे, असेही मोदी म्हणाले.
  9. तसेच प्लास्टिकमुक्तीचा संकल्प, नदी-तलावे साफ करण्याचा संकल्प केला तर देश स्वचंछ राहिल. अमृत सरोवरासाठी संतांनी मदत करावी. प्राकृतिक शेतीला मोहीम म्हणून पुढे नेतो आहे. प्राकृतिक शेती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. असे म्हणत मोदींनी सर्वांना आव्हान केलं आहे.
  10. तर योगदिन येतोय, हे संतांचेच देणे आहे. योग दिवस उत्साहाने साजरा कराल. जय जय रामकृष्ण हरी.. हर हर महादेव, म्हणत आणि काही अभंग म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सांगता केली आहे.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.