Prataprao Jadhav : बुलढाण्यातून थेट केंद्रीय मंत्रीपदी, कट्टर शिवसैनिक प्रतापराव जाधव यांचा कसा आहे राजकीय प्रवास?

महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. तर मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी मिळत आहे. या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Prataprao Jadhav : बुलढाण्यातून थेट केंद्रीय मंत्रीपदी, कट्टर शिवसैनिक प्रतापराव जाधव यांचा कसा आहे राजकीय प्रवास?
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 2:15 PM

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळालं असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश असून एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. तर आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. तर मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी मिळत आहे. या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतापराव जाधव बनणार केंद्रीय मंत्री ?

शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचीही मंत्रीमंडळात वर्णी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवली. बुलढाण्याचा गड अभेद्य राखणाऱ्या प्रतापराव जाधव यांनी विजय संपादन केला. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रतापराव जाधव यांनी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करून सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकली. त्यामुळे जाधव यांचीही केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. प्रतापराव जाधव हे सर्वात वारिष्ठ आणि सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी संसदीय समितीत सदस्य म्हणून देखील काम सांभाळले आहे. खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत ? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता ? ते जाणून घेऊया.

खासदार प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास

प्रतापराव गणपतराव जाधव यांचा जन्म बुलढाणा येथील मेहकर येथे 25 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. त्यांनी बी.ए (द्वितीय वर्ष) पर्यंत शिक्षण घेतलं आहे. शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. प्रतापराव जाधव हे एक समर्पित आणि सुलभ राजकारणी म्हणून ओळखले जातात. तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याचा त्यांचा दृष्टिकोन सर्वश्रुत आहे.

राजकीय प्रवास

1995 ते 2009 – आमदार , मेहकर विधानसभा

1997 ते 1999 – क्रीडा राज्य मंत्री . महाराष्ट्र राज्य.

2009 – बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना कडून खासदार म्हणून निवड.

2009 ते 2024 सलग चार वेळा बुलढाणा लोकसभा मतदार संघातून विजय.

2009 ते 2024 – अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम

प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते सुरूवातीपासूनच शिवसेनेत आहे. प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम साधला आहे. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.

शिवसेनेने प्रतापराव जाधवांना 2009 साली त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी ठरले आहेत. त्यांनी संसदीय समितीत सदस्य म्हणून देखील काम सांभाळले आहे. त्यामुळे यावेळी त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातून थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत झालेला त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.