सुरुवात मराठीत, भाषण हिंदीत, शेवट कन्नड, मोदींच्या भाषणाने नेते अवाक्
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा झाली. केंद्र सरकारच्या विविध योजनेतून साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सोलापुरात आज दाखल झाले होते. सोलापुरातील पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा झाली. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदींनी योजनांच्या शुभारंभाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. […]
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा झाली. केंद्र सरकारच्या विविध योजनेतून साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सोलापुरात आज दाखल झाले होते. सोलापुरातील पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा झाली. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदींनी योजनांच्या शुभारंभाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यावेळी मोदींनी सोलापूरचा विकास, आर्थिक आरक्षण, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा, नागरिकत्व विधेयक यासह विविध मुद्दयावरुन भाष्य केलं. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली, संपूर्ण भाषण हिंदीतून आणि सोलापूरच्या काही भागात कन्नड भाषा बोलली जात असल्याने भाषणाचा शेवट कन्नडमधून केला.
भाषणाची सुरुवात मराठीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचं सोलापुरात स्वागत केलं. पारंपारिक पगडी, 200 वर्ष जुनी हाताने लिहिलेली भगवत् गीता, तलवार आणि घोंगडी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापुरात स्वागत करण्यता आलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. मोदी म्हणाले, “लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे संत दामाजी पंत यांना मी साष्टांग नमस्कार करतो. हुत्माता श्री मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा यांच्या असीम देशभक्तीला मी सलाम करतो. डॉक्टर द्वारकानाथ पोतनीस यांच्या या सोलापूर भूमीत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशिर्वाद देण्यासाठी जमला आहात, त्याबद्दल आपणास मी अभिवानद करतो” अशी भाषणाची मराठीत सुरुवात मोदींनी केली.
#सोलापूर| पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवात कशी केली? @narendramodi @Dev_Fadnavis #Solapur pic.twitter.com/7lK0OXMCmr
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2019
यानंतर पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भाषण हिंदीत केलं. आम्ही ज्याचं भूमीपूजन करतो, त्या कामाचं उद्घाटनही करतो, असं म्हणत मोदींनी आम्ही केवळ आश्वासन देत नाही तर प्रत्यक्षात काम पूर्ण करतो असं सांगितलं.
यावेळी मोदींनी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गाची घोषणाही केली. ज्याचं आम्ही भूमीपूजन करतो, त्याचं उद्घाटनही करतो, असं म्हणत मोदींनी गरीबांसाठी घरांच्या कामाचं भूमीपूजनही केलं. 30 हजार घरांचं भूमिपूजन झालं आहे, घर बांधून झाल्यावर चावी देण्यासाठी मीच येणार, असं मोदी म्हणाले. सोलापूर-उस्मानाबाद हायवे चारपदरी झाला, आज त्याचं लोकार्पण झाले, 1 हजार कोटीचा हा प्रकल्प सर्वांसाठी खुला झाला, असं त्यांनी नमूद केलं.
भाषणाचा शेवट कन्नडमध्ये
यावेळी मोदींनी आपल्या भाषणाचा शेवट कन्नड भाषेत केला. मोदी म्हणाले “पुढील आठवड्यात मकरसंक्रात आहे. मला कल्पना आहे या काळात सोलापूरमध्ये श्री सिध्दरामेश्वरांची फार मोठी गड्ड्याची यात्रा भरते. मकर संक्रांत आणि गड्डा यात्रेनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज वेळ आहे तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी मकर संक्रातीच्या मराठी आणि कन्नडमध्ये शुभेच्छा दिल्या.
येल्लारिगो, मकर संक्राती मत्तो, गड्डा यात्रेयाहा हार्दिक शुभाशेगलो, यल्लुबेल्लातिंडी, सिंहीमाकनाडी, बोला बोला एगदीभक्तलिंगा, हर बोला हर, श्री सिध्दरामेश्वर महाराज की जय, असं मोदी म्हणाले.
#सोलापूर – पंतप्रधान मोदींकडून मकर संक्रातीच्या मराठी आणि कन्नडमध्ये शुभेच्छा @narendramodi @BJP4Maharashtra pic.twitter.com/kJNwSvFG67
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2019
नरेंद्र मोदी लाईव्ह
- मिशेल मामा दुसऱ्याच विमानांचा व्यवहार करत होता, आता काँग्रेसवाल्यांनी मिशेल मामाशी काय संबंध हे सांगायला हवं, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
- आम्ही ज्याचं भूमीपूजन करतो, त्याचं उद्घाटनही करतो, 30 हजार घरांचं भूमिपूजन झालं आहे, घर बांधून झाल्यावर चावी देण्यासाठी मीच येणार
- हवाई चप्पल घालणाऱ्या लोकांना हवाई सफरसाठी प्रयत्न केले, येत्या काळात सोलापुरात उडाण योजना कार्यान्वित करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह h
- -नागरिकत्व विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून परतलेल्या भारतीयांना पुन्हा भारताची ओळख मिळणार, भारत माता की जय म्हणणाऱ्या, भारताबद्दल आस्था असणाऱ्यांना नागरिकत्व मिळणार
- आरक्षणाच्या नावावर काही लोक दलितांचे आरक्षण काढण्याबाबत, ओबीसींचे आरक्षण काढण्याबाबत संभ्रम निर्माण करत होते, मात्र आम्ही दहा टक्के आरक्षण वेगळे देऊन विरोधकांना चपराक दिलीय
- तुकड्यांमध्ये विचार करण्याऐवजी आम्ही सर्वसमावेशक निर्णय घेतले, सबका साथ सबका विकास ही आमच्या सरकारची संस्कृती, आमचे संस्कार
- सोलापूर-उस्मानाबाद हायवे चारपदरी झाला, आज त्याचं लोकार्पण झाले, 1 हजार कोटीचा हा प्रकल्प सर्वांसाठी खुला झाला
- आम्ही ज्याचं भूमीपूजन करतो, त्याचं उद्घाटनही करतो
- सोलापूरच्या धरतीवरुन देशाचं अभिनंदन करु इच्छितो, काल रात्री लोकसभेत ऐतिहासिक विधेयक पास झालं, सामान्य गरिबांना 10 टक्के आरक्षण देऊन, सबका साथ सबका विकास करण्याचं काम आणखी मजबूत केलं
- संविधान दुरुस्ती विधेयकाला काल लोकसभेत काहींनी विरोध केला, मात्र आज राज्यसभेतही सकारात्मक चर्चा करुन, लोकसभेप्रमाणेच सुखद निर्णय व्हावा अशी आशा करतो
- विरोधकांनी खोटं पसरवलं, Sc/st आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण केला, मात्र आम्ही सर्वांना दाखवून दिलं, दलित, ओबीसी, आदिवासींचं कोणीही काहीही घेऊ शकणार नाही, उलट आम्ही 10 टक्के अधिक आरक्षण दिलं, विरोधकांना लोकसभेने सणसणीत चपराक दिली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह
- ज्या ज्या वेळी मी सोलापुरात आलो लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं
- सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाला मंजुरी दिलीय, तुळजाभवानीच्या आशिर्वादाने ही रेल्वेलाईन लवकरच तयार होईल
- सोलापूरच्या धरतीवरुन देशाचं अभिनंदन करु इच्छितो, काल रात्री लोकसभेत ऐतिहासिक विधेयक पास झालं, सामान्य गरिबांना 10 टक्के आरक्षण देऊन, सबका साथ सबका विकास करण्याचं काम आणखी मजबूत केलं
- पारंपरिक पगडी, भगवतगीता, तलवार आणि घोंगडी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मोदींचे स्वागत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंदीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल विद्यासागर राव, खासदार शरद बनसोडे,सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी व्यासपीठावर उपस्थित
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे
मोदी जेंव्हा जेंव्हा सोलापुरात आले तेंव्हा तेंव्हा कांही तरी देऊन गेले –फडणवीस
मोदी हे सोलापुरात तीनदा येणारे मोदी एकमेव पंतप्रधान -फडणवीस
नरेंद्र मोदींनी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 450 कोटी दिले, ही योजना झाली तर सोलापुरात 24 तास पाणी मिळेल – मुख्यमंत्री
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला पंतप्रधान मोदींची मान्यता
सोलापूरच्या पवित्र भूमीत तीन वेळा येणारे मोदी पहिले पंतप्रधान
एनटीपीसी च्या घाण पाण्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना पाणी देणार
30 हजार घराच्या प्रकल्पासाठी मोदींनी तात्काळ मंजुरी दिली
अनेक वेळा भूमिपूजन होते मात्र उदघाटन होत नाही, मात्र मोदींच्या काळात असं होत नाहीय
आम्ही दुष्काळासाठी अहवाल दिलाय, मोदींनी त्याला तात्काळ मंजुरी द्यावी ,जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी
कोणकोणत्या योजनांचा शुभारंभ?
सोलापुरातील विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 30 हजार घरकुलाचे हस्तांतरण, स्मार्ट सिटीच्या कामाचं उद्घाटन, 180 कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेचं उद्घाटन, देहू-आळंदी पालखी मार्गाचं भूमीपूजन, तुळजापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचं भूमीपूजन अशा विविध कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा शासकीय दौरा असला तरी भाजपनेही मोदींच्या कार्यक्रमासाठी कंबर कसलीय.
जाहीर सभा घेऊन मोदी आगामी निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार हे निश्चित आहे. प्रचाराची सुरुवात सोलापुरातून करण्याचं कारणही तसंच आहे. पाच वर्षांपूर्वी सोलापूर लोकसभा काँग्रेसची मोठी ताकद होती. तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा प्रभाव होता. महापालिका काँग्रेसचा बालेकिल्लाच होता. त्या मानाने भाजप केवळ जिल्ह्यात नावालाच होते. मात्र मोदी लाटेत शिंदेचा पराभव झाला. एक प्रकारची शिंदेशाही संपली. तर काँग्रेसची पालिकेतील वर्षानुवर्षाची सत्ता जाऊन भाजपने पालिकेत विजयश्री मिळवली.
नरेंद्र मोदींचा दौरा
10.45 वाजता हेलिकॉफ्टर ने सोलापुरात दाखल होणार
10.45 ते 11 वाजता हेलिपॅड वरून सभा स्थळी दाखल
11 वाजता पार्क स्टेडियम वर शासकीय प्रकल्पाचे भूमिपूजन
विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 30 हजार घरकूलाचे भूमिपूजन करणार
स्मार्ट सिटीच्या कामाचे उद्घाटन,180 कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेचे उद्घघाटन करणार
उजनी सोलापूर दुहेरी 110 एमएलडी पाईपलाईनच्या कामाचे उदघाटन
अमृत योजनेतील भूमिगत सिवेज सिस्टमचे भूमिपूजन
सोलापूर उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गाचे करणार लोकार्पण
देगाव सिवेज 3 stp प्रकल्पाचे करणार लोकार्पण
त्यानंतर घेणार जाहीर सभा