पंतप्रधानांनी जिथे हात लावला, तिथे अशुभ घडलंय, मोदींचा अमृतकाळ संपलाय; संजय राऊत यांची खोचक टीका

नीट घोटाळाप्रकरणी सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या देशातले लाखो विद्यार्थी आज रस्त्यावर आलेत, त्यांचे पालक रस्त्यावर आले आहेत. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इतर सर्व विषयांवर बोलतात, टीका-टिपण्णी करतात. पण ते पुढे येऊन, 'नीट' वर किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर का बोलले नाहीत, असा सवाल विचारत संजय राऊ यांनी मोदींवर टीका केली.

पंतप्रधानांनी जिथे हात लावला, तिथे अशुभ घडलंय, मोदींचा अमृतकाळ संपलाय; संजय राऊत यांची खोचक टीका
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 10:58 AM

या देशातील सर्व प्रमुख विमानतळं ही मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. भाजपला अर्थपुरवठा करणाऱ्या गुजरातच्या ठेकेदारांनी देशभरातली विमानतळं बांधली आहेत. फक्तं दिल्लीचं विमानतळ नव्हे तर जबलपुरचं विमानतळ सुद्धा आज कोसळलं. तीन महिन्यांपूर्वीच या विमानतळाचं उद्घाटन झालं. मोदींनी उद्घाटन केलेलं राम मंदिर पहिल्याच पावसामध्ये गळू लागलं. अख्खी अयोध्या पाण्याने तुंबली. १७ हजार कोटी खर्च करून तयार केलेल्या महाराष्ट्रातील अतल सेतूला तडे पडले. जिथे या सरकारच्या वतीने मोदी यांनी हात लावला, तिथे अशुभ घडलंय. मोदींचा अमृत काळ संपला आहे, आता अशुभकाळ सुरू झालाय, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

नीट घोटाळ्यावर पंतप्रधान का बोलत नाहीत ? 

आणीबाणीचा विषय ५० वर्षानंतर काढण्याचं काय प्रयोजन आहे. नीटवर त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. लाखो विद्यार्थी, पालक रस्त्यावर आहे. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इतर सर्व विषयांवर बोलतात, टीका-टिपण्णी करतात. पण ते पुढे येऊन, ‘नीट’ वर किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर का बोलले नाहीत, असा सवाल विचारत राऊत यांनी मोदींवर टीका केली.

देशाचे शिक्षणमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे. अशी मागणी संजय राऊत यांनी नीट परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केली. आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत मागणी केलीय की, आजचं कामकाज थांबवून फक्त नीट घोटाळ्यावर चर्चा करावी. मोदींनी त्यावर उत्तर द्यावं, असे राऊत म्हणाले.

जर सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर सरकारला इंडिया आघाडीची ताकद दाखवावी लागेल.लोकसभेत आमची ताकद दुर्लक्षित करता येत नाही. सरकारला काठावर बहुमत आहे. भाजपला लोकसभेत बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सरकारला लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही आव्हान उभं करू, असं राऊत यांनी ठणकावलं.

हा सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

सरकारने आधीच अर्थसंकल्प फोडल्याचं चित्र काही वृत्तपत्रात बातम्या आल्या. अर्थसंकल्प फुटला. कालच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हे सरकारचं निरोपाचं अधिवेशन आहे. निवडणुकीनंतर हे सरकार दिसणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणा मोदींनी लोकसभेत केल्या होत्या. तरीही त्यांना राज्यातील जनतेने पराभूत केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.