महाराष्ट्रात 11 महिन्यात नव्या 1 लाख लखपती दीदी निर्माण झाल्या; पंतप्रधान मोदींकडून स्त्रीशक्तीचा गौरव

तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला.

महाराष्ट्रात 11 महिन्यात नव्या 1 लाख लखपती दीदी निर्माण झाल्या; पंतप्रधान मोदींकडून स्त्रीशक्तीचा गौरव
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 2:06 PM

PM Narendra Modi Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडत आहे. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या आहेत. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला.

“मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे, असं म्हटलं होतं. लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचं अभियान नाही, पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचं महाअभियान आहे”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

“महायुतीच्या सरकारनेही मोठी मेहनत घेतली”

“आज देश विकसीत होत असताना मातृशक्ती पुढे आल्या आहेत. राज्यातील सर्व बहिणी अत्यंत चांगलं काम करत आहे. तुमच्या सगळ्यात माँ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंची छाप पाहत आहे. मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे, असं म्हटलं होतं. म्हणजे सर्व स्वावलंबी आहेत. त्यांची एक वर्षाची कमाई एक लाखाहून अधिक असेल. काही वर्षात १ कोटी लखपती दिदी झाल्या. तर दोन महिन्यात ११ लाख अजून लखपती दिदी त्यात अॅड झाल्या. नव्या ११ लाख लखपती दिदी झाल्या. यातही एक लाख नवीन लखपती दिदी आपल्या राज्यात तयार झाल्या आहेत. यात येथील महायुतीच्या सरकारनेही मोठी मेहनत घेतली आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“गावाच्या अर्थव्यवस्थेला बदलायचं”

“शिंदेंच्या टीमने माता बहिणींना सशक्त करण्यासाठी कामाला लागली आहे. महिला, तरुण, शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक योजना, नवनवीन योजना आणल्या जात आहेत. लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचं अभियान नाही. पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचं महाअभियान आहे. गावाच्या अर्थव्यवस्थेला बदलायचं आहे”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

“लखपती दिदीमुळे कुटुंबाचा कायापालट”

“या मैदानातील प्रत्येक बहीण, मुलीला चांगलं माहीत आहे की, जेव्हा त्या कमावतात, तेव्हा त्यांचा अधिकार वाढतो. घरात त्यांचा सन्मान वाढतो. जेव्हा महिलांची कमाई वाढते तेव्हा घरातील लोकांकडे खर्चासाठी पैसा मिळतो. लखपती दिदी मुळे कुटुंबाचं कायापालट होत आहे”, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.