महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सर्वाधिक, हयगय करु नका, पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेच्या सूचना

आपण ही लढाई जिंकणार, जिंकायची आहे, जिंकणारच, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. (PM Narendra Modi On Maharashtra Corona) 

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सर्वाधिक, हयगय करु नका, पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेच्या सूचना
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 12:53 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका हा अद्याप संपलेला नाही. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका हा सर्वाधिक आहे. त्यामुळे जोपर्यंत दवा येत नाही, तोपर्यंत हयगय करु नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली. दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज (13 ऑक्टोबर) पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान त्यांनी या सतर्कतेच्या सूचना दिल्या. (PM Narendra Modi On Maharashtra Corona)

देशभरात कोरोनाचा धोका अद्यापक कायम आहे. महाराष्ट्रात हा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की मास्क लावा, हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा. जोपर्यंत दवा नाही, तोपर्यंत हयगय करू नका, आपण ही लढाई जिंकणार, जिंकायची आहे, जिंकणारच, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“बाळासाहेब विखे पाटील यांचं सर्वच क्षेत्रातील योगदान वाखाणण्यासारखं”

“डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले होते. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचा विकास हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. राजकारण करताना सुद्धा समाजाचे प्रश्न सोडवण्यावर माझा नेहमी भर राहिला असे डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“सहकारीतेला निधर्मी चळवळ मानून त्यांनी सहकाराद्वारे गावांचा विकास केला. देह वेचावा कारणी या संत तुकाराम महाराजांच्या शब्दांमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटलांच्या जीवनाचे सार आहे,” असेही मोदी म्हणाले.

“प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या नावाशी बाळासाहेबांचे नाव जोडले जाणे हे अत्यंत योग्य आहे. शेतीमधील पारंपरिक ज्ञान जोपासून आपण आधुनिकता आणि पारंपरिक ज्ञानाचा मेळ घातला पाहिजे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“राज्यातील 13 जिल्ह्यांमधील भूजल पातळी चिंताजनक आहे. गावांमध्ये आत्मनिर्भरतेचा विश्वास बाळासाहेब जागवू इच्छित होते. कोरोनाविषयक योग्य वर्तणुकीचे पालन करण्याची महाराष्ट्रातील जनतेला कळकळीची विनंतीही नरेंद्र मोदी यांनी केली.” 

हेही वाचा – पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता

दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज (13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट

परखडपणे मत व्यक्त करणारे नेते म्हणून ओळख असणारे बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रवेश ते राजीनामा , पवार – विखे संघर्षाची किनार, राजीव गांधी यांच्या काळात उभारलेला युथ फोरम, पुलोद स्थापनेवेळी शरद पवारांचे स्थान यासह अनेक राजकीय संघर्षावर बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात भाष्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (PM Narendra Modi On Maharashtra Corona)

संबंधित बातम्या : 

Balasaheb Vikhe Patil Autobiography : बाळासाहेब विखे पाटील यांचं सर्वच क्षेत्रातील योगदान वाखाणण्यासारखं : पंतप्रधान मोदी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.