मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकापर्ण आणि काही कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता मोदी यांची सभा पार पडणार आहे.यावेळी मोदी काय भाषण करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यासह राज्य, देश आणि विदेशातील बातम्याची अपडेट जाणून घ्या.
चेन्नई शहर महिलांसाठी सर्वांत सुरक्षित शहर
पुणे दुसऱ्या क्रमांकावर
त्यानंतर बंगळुरू, हैदराबाद आणि मुंबई
विशेष म्हणजे राजधानी दिल्ली 14 व्या क्रमांकावर
टॅलेंट स्ट्रॅटेजी कन्सल्टींग फर्मच्या अहवालातील माहिती
शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलवलेल्या बैठकीत गोळीबार झाल्याची चर्चा
शिवजयंतीच्या नियोजन बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने
शिंदे गटाने शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलावली होती सर्वपक्षीय बैठक
त्याचवेळी ठाकरे गटानेही त्याच ठिकाणी केलं होतं बैठकीचं आयोजन
नरेंद्र मोदी नेमकं काय-काय म्हणाले?
मुंबई शहराला चांगलं बनवण्यात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध योजनांच्या लाभार्थींना आणि मुंबईकरांचं अभिनंदन करतो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज भारत मोठं स्वप्न पाहण्याचं आणि पूर्ण करण्याचं धाडस करतोय. नाहीतर याआधी फक्त गरिबीवर चर्चा करण्यात आणि दुसऱ्या देशाकडून मागामाग करण्यातच गेला. पण आता आझाद भारताच्या मोठ्या संकल्पावर जगाचा विश्वास आहे.
एकनाथ शिंदे यांनी दावोसमधला आपला अनुभव व्यक्त केला. सगळीकडे तसाच अनुभव येतोय. भारताबद्दल सगळ्यांच्या मनात सकारात्मक विचार आहेत. भारताकडे आशेने पाहिलं जातंय. आज प्रत्येकाला वाटतंय की भारत ते करतोय जे विकासासाठी आणि समृद्धीसाठी खूप आवश्यक आहे. आज भारत अभूतपूर्व आत्मविश्वासाने भरलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्वराज्याची भावना आजच्या हिंदुस्तानात डबल इंजिन सरकारमध्ये प्रबळ रुपाने प्रकट होतंय. आम्ही ती वेळ पाहिलीय जेव्हा गरिबांच्या कल्याणाच्या पैशांमध्ये घोटाळा केला जायचा. संवेदनशीलताचा नाव नव्हतं. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना नुकसान झालं. आम्ही गेल्या आठ वर्षात वातावरणात बदल केलाय. भारत आता सगळ्याच क्षेत्रात पुढे जातोय. आज देशात एकीकडे घर, टॉयलेट, वीज, कुकिंग गॅस, मोफत आरोग्य, मेडिकल कॉलेज, आयआयटी सारख्या अनेक सुविधांचा वेगाने निर्माण होत आहे. दुसरीकडेव आधुनिक कनेक्टिविटीकडेही लक्ष आहे.
मुंबईला भविष्यासाठी तयार करणं हे डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. मुंबई मेट्रोचं काम जोरात सुरु आहे. २०१४ मध्ये मुंबईत फक्त १४ किमी मेट्रो सुरु होती. पण जेव्हा तुम्ही डबल इंजिन सरकार आणलं तेव्हा मेट्रोचा विस्तार जोरात झाला. काही काळासाठी विस्ताराचा वेग मंदावला. पण शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर पुन्हा वेगाने काम होऊ लागलं आहे. मुंबईत 300 किमी मेट्रो नेटवर्कसाठी आम्ही वेगाने धावत आहोत. आज देशभरात रेल्वेला आधुनिक करण्यासाठी काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्राची रेल कनेक्टिविटीला त्याचा फायदा होत आहे. डबल इंजिन सरकार सामान्य नागरिकालाही आधुनिक सुविधा, फास्ट स्पिडचा अनुभव देण्याचा विचार करत आहे, जे कधी फक्त नुकत्याच लोकांना मिळायच्या. त्यामुळेच आता रेल्वे स्टेशनला विमानतळासारखं रुप दिलं जातंय.
इथे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातील. सामान्य नागरिकांना सुविधा मिळो हेच ध्येय आहे. फक्त रेल्वे सुविधाच नाही तर अनेक सुविधांचं रेल्वे स्टेशन हब असणार. बस, मेट्रो ट्रेन सुविधा मिळेल.
येणाऱ्या आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतोय.
मुंबईच्या रस्त्यांना सुधारण्यासाठी जे काम सुरु झालंय ते डबल इंजिन सरकारचा निश्चय दाखवतो. आम्ही प्रदूषणपासून स्वच्छता प्रयत्न प्रत्येक सुविधेसाठी काम करत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून केली भाषणाला सुरुवात
जगभर भारतासंदर्भात सकारात्मक वातावरण
देशातील अनेकांची अर्थव्यवस्था खराब आहे पण देशात पायाभूत सुविधांवर अनेक कामे सुरु आहेत
विकसित भारताच्या निर्माणासाठी आपली शहरांची महत्वाची भूमिका
येत्या २५ वर्षांत राज्यातील अनेक शहर देशांच्या विकासाला चालना देणार आहे
मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे
शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच कामांना वेग
मुंबईच्या विकासासाठी पैसा कमी पडू देणार नाही
पैसा भ्रष्टाचारात जाऊ नये हे पाहणेच महत्वाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोट कंट्रोलद्वारे मुंबई मेट्रोचे उद्घाटन केले
मेट्रो २ अ व मेट्रो ७ चे लोकार्पण
आपल्या दावाखाना प्रकल्पाचे उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगितले
दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा दिसल्याचे सांगितले
अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असे सांगत होते
मोदीजी यांच्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
मविआच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते सर्वांना माहीत
येत्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट झालेला दिसेल
मोदींमुळे राज्याला विकासाची संधी मिळाली
मविआच्या काळात राज्याचा विकास ठप्प झाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला मराठीतून सुरुवात, हिंदीचा वापर मुख्यमंत्री शिंदे करत होते
दोन वर्षांत मुंबईचा चेहरा बदललेला दिसेल
मोदी यांंच्या व्यक्तीमत्वामुळे आम्हाला उर्जा मिळते
काही जणांनी मोदी मुंबईत येऊ नये असे वाटत होते, असे ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे यांनी सांगितले
समृद्धी महामार्ग मुंबईत येणार आहे. मेट्रो प्रकल्प होतोय, ३५० किमीचे मेट्रोचे जाळे, लाखो लोकांना मेट्रोचे फायदा
मेट्रोचे जाळे पुर्ण झाल्यावर रस्त्यावरील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील, प्रदूषण कमी होईल
मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आज २० रुग्णालय सुरु होताय, १२३ लवकरच सुरु होणार
दोन-अडीच वर्षात संपुर्ण मुंबई खड्डेमुक्त होणार
४० वर्ष रस्त्यांवर खड्डे पडणार नाही. यामुळे काळे पांढरे करणाऱ्या लोकांची दुकाने बंद होतील
काही लोक विकास कामांना खोडा घालण्याचे काम करताय, त्यांना त्यांचे काम करु द्या आपण आपले काम करु
सहा महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी केले, एसटीतून ज्येष्ठांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्सहन भत्ता सरकारने दिले. अनेक जनहिताचे निर्णय सरकारने सहा महिन्यात घेतल्यामुळे विरोधकांना धडकी भरली.
महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं धावतोय
मुंबईकरांचं मोदींवर प्रेम
भाजपशी गद्दारी करून 2019 ला मविआ सरकार
फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल
मोदींसमोर फडणवीसांकडून एकनाथ शिंदे यांचं कौतुक
एकनाथ शिंदेंनी राज्यासाठी 1.55 लाख कोटींचे उद्योग आणले
डबल इंजिनचं सरकार राज्यात बदल घडवणार
उपमुख्यमंत्री यांच्या भाषणाला हिंदीतून सुरुवात
मुंबईत सर्वाधिक लोकप्रिय मोदी
फडणवीस यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यांवर साधला निशाणा
डबल इंजिन सरकार काही लोकांमुळे गेली, पण आता शिंदेमुळे पुन्हा डबल इंजिन सरकार
मुंबई महानगरपालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वत:चे खिशे भरले. मुंबईकरांना शुद्ध पाणी दिले नाही
मुंबई मनपाने रस्ते तयार करण्यात मोठा भ्रष्टाचार केला, यामुळे आता ४० वर्ष टिकतील असे रस्ते
धारावीचे टेंडर मंजूर, मोदीजींनी रेल्वेची जागा दिली. त्यामुळे एक लाख लोकांना घरे मिळतील
बीकेसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन
मंचावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नारायण राणे, भागवत कराड, रामदास आठवले
ढोल ताशे, लेझीमच्या गजरात मोदी यांचे स्वागत
मंचावर पहिल्या रांगेत राज्यपाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रीयन परंपरेने मोदी यांचे स्वागत
शिवाजी महाराज यांचा पुतळा मोदी यांना भेट
पंतप्रधान मोदी व्यासपीठावर पोहचले
व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदी यांचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसीत दाखल
थोड्याच वेळेत सुरु होणार सभा
मोदी यांच्या सभेसाठी मोठी गर्दी
मोदी यांचे विमान मुंबईत दाखल
भारतीय हवाई दलाच्या विमानने पंतप्रधान दाखल
दौऱ्याला ३० मिनिटे उशीर
नरेंद्र मोदी यंच्या हस्ते भांडूपमधील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन होणार
यावरुन आता काँग्रेसची श्रेयवादाची लढाई सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकास कामांचं भूमिपूजन
मार्चमध्ये काँग्रेस नगरसेविका उषा कोपरकर आणि सुरेश कोपरकर यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते.
त्यानंतर या कामाला सुरुवातदेखील झाली, मुंबई महानगरपालिकेच्या फंडातून हे काम केले जात आहे
नरेंद्र मोदींनी आम्ही केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी स्व-हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला
सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी नेमके कोणी प्रयत्न केले याची कल्पना जनतेला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी दिली
मोदींच्या स्वागतासाठी लेझीम पथक बीकेसी मैदानावर दाखल
लेझीम नृत्य करत मोदींचे स्वागत करणार
ढोल ताशे आणि लेझीम नृत्य सादर करत मोदींचे करणार स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळाकडे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्यांसोबत
४.१५ मिनिटांनी पंतप्रधान मुंबईत दाखल होणार
बीकेसीवर मोदींच्या सभेसाठी मोठी गर्दी
देवेंद्र फडणवीस विमानतळाकडे रवाना
थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी मुंबई विमानतळावर
मोदींच्या मिशन मुंबईला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी सायनहून 15 बस भरून कार्यकर्ते होणार रवाना
आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्ते काही वेळातच BKC कडे रवाना होणार
बस रवाना करण्यासाठी आमदार प्रसाद लाड हे स्वतः राहणार उपस्थित
सायन कोळीवाडा विभागातून 15 बस भरून कार्यकर्ते सायन सर्कल परिसरात दाखल
‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंतला अटक
अंबोली पोलिसांनी केली कारवाई
एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोप
मुंबईः
महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता होती का नाही त्यावेळेस भूमिपूजन केली.
नक्की दुटप्पी भूमिका काय आहे ही नेमकी ठरवा….
भास्कर जाधव यांचं संतुलन बिघडलेला आहे….
बाळासाहेबाचा दर्शन घे हे चुकीचं आहे का…?
लाखोंच्या संख्येने नागरिक येतील
शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांची ठाकरे गटावर टीका
मुंबईः
पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल उपस्थित राहणार
भाजपा आणि शिंदे गटाचे सगळे मंत्री व्यासपीठावर करणार मोदींच स्वागत
विमानतळावर फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित…
भारतीय जनता पार्टी ही वाचाळवीरांची पार्टी
जिथे जिथे निवडणुका येतात त्याच ठिकाणी मोदीसाहेब जातात
कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात पण मोदीसाहेब मुंबईत आले नाहीत
कोरोनाकाळात मोदी साहेबांनी विशेष काळजी मुंबईत घेतलेली नाही
पूर्वी शिवसेनेने जी काम आखली होती त्यांचेच उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करायचं हे नरेंद्र मोदी यांचे खासियत
मुंबई महानगर पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधान मुंबईत येत आहेत
मुंबईची जनता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत
मुंबईची जनता महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात देणार
पंढरपूर, कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसही कसब्यात उमेदवार देणार,
जागा काँग्रेसची असल्यामुळे महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि सेनेने आम्हाला मदत करावी,
काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची टीव्ही 9 ला माहिती,
काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे कसबा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी.
कमान कोसळल्याने पोलीस जखमी
सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही
वांद्रे येथील बीकेसी मैदानावरील घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी 4 वाजता होणार सभा
सभेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलिसांची मोठी कुमक
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं होतय स्क्रीनिंग
बीकेसीतील सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते, लाभार्थी यांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था
बीकेसी मैदानात 1 लाखाहून अधिक खुर्च्या ठेवण्यात आल्या
‘पठाण’मधील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावरून मोठा वाद
‘बेशर्म रंग’ गाण्याबद्दल शाहरुखची पहिली प्रतिक्रिया समोर
दीपिकासारखीच एखादी स्टार बेशर्म रंग गाण्याला इतक्या छान पद्धतीने सादर करू शकते- शाहरुख खान, वाचा सविस्तर
डोंबिवली : लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून चोर पसार,
घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून ज्वेलर्स व्यापारी मध्ये भीतीचे वातावरण,
रायकर ज्वेलर्स, बालाजी ज्वेलर्स अशी या दोन दुकानाची नावे असून पोलीसानी तपास सुरू केला आहे.
संजय राऊत पहिल्यांदाच जम्मूत येणार
जम्मू विमानतळावर शिवसैनिक संजय राऊत यांचे स्वागत करणार
त्यानंतर, संजय राऊत विस्थापित काश्मीरी पंडितांची भेट घेणार
नंतर राऊत लखनपूरला रवाना होतील
सायंकाळी लखनपूर येथे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल होत आहे
संजय राऊत यांचा आज रात्री लखनपूर येथे मुक्काम आहे
राऊत उद्या सकाळी राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होतील
बैठकीला नाशिक विभागातून महत्वाचे पदाधिकारी उपस्थित
बैठकीत शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय होणार
बैठकीला सुभाष देसाई, विनायक राऊत उपस्थित राहणार
थोडयाच वेळात बैठकीला होणार सुरुवात
दुपारी या बसेस कल्याण, डोंबिवली परिसरातील प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वार्डात होणार दाखल
स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी या बसमध्ये आपल्या परिसरातील कार्यकर्ते घेऊन पोहचणार मुंबईला
सभेला येणाऱ्यांसाठी पाण्याचीही व्यवस्था
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचे नोंदवले जबाब
दोघींनी सुकेश आणि त्याची सहकारी पिंकी ईराणीवर केले गंभीर आरोप
सुकेशने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली- जॅकलिनचे आरोप, वाचा सविस्तर..
IND vs NZ 1st ODI- स्वत: शार्दुलने त्या खेळाडूच नाव सांगितलं, अखेरच्या क्षणी त्याला कोणी हा सल्ला दिला? वाचा सविस्तर…..
Rashid Khan: महत्त्वाच म्हणजे राशिद खानला एका बॉलरने इतकं चोपलय. वाचा सविस्तर….
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबई जिंकण्याचा निर्धार केला जाणार
नरेंद्र मोदी यांची सभा बीकेसी मैदानात होणार आहे
या सभेसाठी भव्य स्टेजची उभारणी करण्यात आलीय
या स्टेजच्या खाली हे स्लोगन अक्षरात लिहण्यात आलंय
तसेच भव्य रांगोळी सुद्धा काढण्यात आलीय
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्कूट एअरलाइनविरोधात चौकशीचे दिले आदेश
बुधवारी संध्याकाळी 7.55 ऐवजी दुपारी 3 वाजताच विमान रवाना
अमृतसर एअरपोर्टवर प्रवाशांनी घातला होता गोंधळ
दुपारी 4.40 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करणार
सायं. 5 : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई
सायं. 6.30 : मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई
सायं. 7.20 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार
भाडं चुकतं करण्यासाठी थेट ट्विटर ऑफिसमधील वस्तू विक्रीला
टेबल-खूर्चीचा ऑनलाईन लिलाव
या लिलावात 631 वस्तूंच्या विक्रीची योजना
व्हाईट बोर्ड, डेस्क, टेबल, खूर्ची, KN95 चे 100 हून अधिक बॉक्स
डिझायनर खूर्ची, कॉफी मशीन, iMacs, स्टेशनरी, बाईक स्टेशन
चार्जिंग मशीन आणि काही उपकरणांचा लिलावात समावेश
27 तास लिलाव राहील सुरु
हेरिटेज ग्लोबल पार्टनर्स इंक करत आहे लिलाव
पुरुष टीमचच नाही, महिला टीम इंडियाच सुद्धा वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन सुरु आहे. वाचा सविस्तर….
IND vs NZ 1st ODI – इशान किशनने मैदानात काय केलं ते एकदा VIDEO मध्ये बघा. महत्त्वाच म्हणजे त्याच मॅचमध्ये हिशोब चुकता केला. वाचा सविस्तर…
IND vs NZ 1st ODI – Shubman gill च्या सेंच्युरीमुळे जगभरातील भारतीय क्रिकेटप्रेमी आनंदात आहेत, पण एक व्यक्ती…. वाचा सविस्तर….
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी आक्रमक,
सातवा वेतन आयोग अद्याप लागू न केल्याने विद्यापीठातील कर्मचारी आक्रमक,
5 फेब्रुवारीचा अल्टीमेटम; 20 फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा,
विद्यापीठ व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याने काम बंदचा इशारा,
चार टप्प्यात होणार विद्यापीठ कर्मचाऱ्याचे आंदोलन.
क्रूड ऑईलचे दर पुन्हा 80 डॉलर प्रति बॅरल
यापूर्वी कच्चे तेलाचे भाव 100 डॉलर प्रति बॅरलवर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर
कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
गेल्या सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल नाही
अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अप्पर वर्धा धरनात 77 टक्के जलसाठा,
यंदा जिल्ह्यात पाणी टंचाई आणि सिंचन पूरवठयाचा भार हलका,
यंदा पाऊस चांगला झाल्याने 54 प्रकलमध्ये मुबलक पाणी जलसाठा.
तर पीएमपीएल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढली,
त्यासोबतच नव्या 458 ई बसेस देखील रस्त्यावर,
दैनंदिन प्रवाशांची संख्या बारा लाखाच्या पुढे,
शहरात आता रोज धावत आहेत पीएमपीएल च्या 1750 बसेस.
औरंगाबाद : दावोसा येथे झाला कंपनीचा राज्य सरकारच्या सोबत करार,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करार,
या करारामुळे साडे सहा हजार नागरिकांना मिळू शकतो रोजगार,
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली माहिती.
पंतप्रधान मुंबईत येत असल्याने काही काही बिजनेस संस्था आणि आस्थापना बंद राहतील अशा अफवांचे मेसेज व्हायरल
अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मुंबई पोलिसांचे आवाहन
मुंबईत सगळ्या आस्थापना सुरळीत सुरू असून अफवावर विश्वास ठेवू नका असे पोलिसांचे आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट
आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे
या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे, हा विश्वास आहे, शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा गाड्यांची बल्क बुकिंग
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून सुटणार एसटी बसेस
भाजपमधील विश्वसनीय सूत्रांची माहिती
आज सकाळी सुटणार एसटी बसेस
भाजपा आणि शिंदे गटाकडून गर्दी जमवण्याचा प्रयत्न
मुंबईत साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त
400 अधिकारी राहणार तैनात
भाजपचे स्वयंसेवकही तैनात राहणार
सभेला दीड लाख लोक येण्याचा अंदाज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी वांद्रे येथील बीकेसी मैदानावर सभा होणार आहे
दुपारी 4 वाजता ही सभा होणार आहे
यावेळी मोदी मुंबईतील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार
मोदी यांच्या मुंबई दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष