Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेडकर, हेडगेवार यांना अभिवादन, नरेंद्र मोदी नागपुरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आज पार पडला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि स्मृती मंदिरात हेडगेवार व गोळवलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि माधव नेत्रालयाच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केली.

आंबेडकर, हेडगेवार यांना अभिवादन, नरेंद्र मोदी नागपुरात
pm narendra modiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2025 | 11:02 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज ते नागपुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट देऊन स्मृती मंदिरात संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहिली. या वेळी पंतप्रधान मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. केशव हेडगेवार यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माधव सदाशिव गोळवलकर यांनाही श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच RSS च्या मुख्यालयात आले आहेत. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना संघ मुख्यालयात येऊन गेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यादरम्यान स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीलाही भेट दिली. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाईल. तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.

पंतप्रधानांचा आजचा कार्यक्रम काय आहे?

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नागपुरात चार हजारपेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 8.30 वाजता नागपूर विमानतळावर येतील. 9 वाजता हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आगमन झाले. यानंतर सकाळी 9.30 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दीक्षाभूमी येथे आगमन झाले. 10 वाजता माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यानंतर सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला भेट दिली. दुपारी 1.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडसाठी रवाना होणार आहेत.

मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच RSS च्या मुख्यालयात पोहोचले आहेत. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे देखील पंतप्रधान असताना संघ कार्यालयात आले होते. या कार्यक्रमानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर असणार आहेत. यापूर्वी ते दोघे अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात एकत्र होते.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.