पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता

बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 7:58 AM

शिर्डी: दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होतील. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’असे नाव दिले जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मराठीत ट्विट करुन आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. (Balasaheb Vikhe Patil autobiography)

परखडपणे मत व्यक्त करणारे नेते म्हणून ओळख असणारे बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रवेश ते राजीनामा , पवार – विखे संघर्षाची किनार , राजीव गांधी यांच्या काळात उभारलेला युथ फोरम याबरोबरच पुलोद स्थापनेवेळी शरद पवारांचे स्थान यासंदर्भात बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात भाष्य केल्याचे समजते.

दरम्यान, राधाकृष्ण विखे यांनी पुस्तकातील गौप्यस्फोटाबाबत माहिती न देता आपल्यासही याबाबत उत्कंठा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राविषयी राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांसोबत काम केले होते. कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते.

राज्‍यातील सर्व पक्षांच्‍या खासदार, आमदारांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्‍यात आले असून, जिल्‍ह्यातही विविध तालुक्‍यात सर्वच पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी उपस्थित राहावे यासाठी प्रवरा परिवारातील विविध संस्‍थाच्‍या पदाधिकाऱ्यांकडून नामवंतांना व्‍यक्तिगत भेटी घेऊन या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते.

संबंधित बातम्या:

‘आमची बांधिलकी ‘सिल्व्हर ओक’-‘मातोश्री’ला अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही’

‘थोरातांची कमळा’ चित्रपट गाजला, आता ‘विखे पाटलांची कमळा’ आला आणि पडला : सामना

मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना पद, गांधी-नेहरु सोडून ते ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवतात : राधाकृष्ण विखे पाटील

(Balasaheb Vikhe Patil autobiography)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.