Devedra Fadnavis Live Update : महाविकास आघाडी सरकार कौरवांचेही बाप :सुधीर मुनगंटीवार
फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना आज 11 वाजता चौकशीसाठी बीकेसी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. दरम्यान फडणवीस यांना चौकशीची नोटीस आल्यानंतर राज्यातील भाजप नेते अधिक आक्रमक झाले आहेत.
पोलीस बदली घोटाळा अहवाल प्रकरणातील अहवाल बाहेर आल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना आज 11 वाजता चौकशीसाठी बीकेसी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. दरम्यान फडणवीस यांना चौकशीची नोटीस आल्यानंतर राज्यातील भाजप नेते अधिक आक्रमक झाले असून, ठिकठिकानी या नोटीसीच्या होळी करण्यात येत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोटीसीची होळी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे. दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन होणार आहे. थोड्याचवेळात या आंदोलनाला सुरुवात होईल, या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
मविआ सरकार कौरवांचेही बाप असल्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका
मविआ सरकार कौरवांचेही बाप असल्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका,
ज्या देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे म्हणजे कट- कपट कारस्थान यांचा उगम असल्याची टीका,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घोटाळेबाजांना उघडे करणाऱ्या फडणवीस यांच्यासारख्या विरोधी नेत्यांना दिली जाणारी वागणूक संतापजनक असल्याची टीका,
हे सरकार इंग्रजांनाही लाजवेल अशा पद्धतीने वागत असल्याचा घणाघात
-
महविकास आघाडी सरकारची चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा: रावसाहेब दानवे यांचा आरोप
महविकास आघाडी सरकारची चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – रावसाहेब दानवे यांचा आरोप
भाजपच्या सर्व नेत्यांना जरी चौकशीला बोलावलं तरी आम्ही जायला तयार आहोत
पोलिसांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे, फडणवीस यांनी याआधीच केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली होती, फडनवीसांची चौकशी करण्याऐवजी त्यांनी जे पुरावे दिले त्याची चौकशी केली पाहिजे पण या चोराच्या उलट्या बोंबा आहेत.
भाजपच्या सर्व नेत्यांना जरी चौकशीला बोलावलं तरी आम्ही जायला तयार आहोत आम्ही जर चूक केली असेल तर शिक्षा भोगायलाही तयार आहोत पण केंद्रीय यंत्रणा जो तपास करत आहेत. तिकडे निर्दोष असल्याचं महविकास आघाडीतील नेत्यांनी सिद्ध केलं पाहिजे
-
-
या सरकारला नेमकं झालं काय तेच कळत नाही : चंद्रशेखर बावनकुळे
त्यांच्याबद्दलचे पुरावे सरकार कडे आहे ऑडिओ क्लिप अधिकाऱ्यांनी दिले आहे पुरावे दिले आहे त्या सरकारने पुरावे देणार्यांची चौकशी करावी याला काय म्हणायचं
कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे की पुरावे देणार्यांची चौकशी केली जाते
-
ऑफिशियल सिक्रेसी अॅक्टचा भंग केल्यासारखे प्रश्न विचारले: देवेंद्र फडणवीस
पोलीस बदल्यांमध्ये जो महाघोटाळा झाला या महाघोटाळ्याची सगळी माहिती केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर न्यायलयानं या महाघोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं यावर शिक्कामोर्तब केलं. महाघोटाळा मी जर बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा दबून गेला असता.
मी कालही पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती, त्याचं उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, मी त्यांनी मला पोलीस स्टेशलनला उपस्थित राहण्याचं नोटीस देण्यात आलं. मला नोटीस देण्यात आल्यावर मी जाणार असल्याचं सांगितलं. यानंतर सहपोलीस आयुक्त यांनी मला फोन करुन पोलीस घरी येतील असं सांगण्यात आलं
आजच्या प्रश्नांचा रोख गोपनियता कायद्याचा भंग केला असा होता. प्रश्नांचा रोख गोपनियता कायद्याचा भंग केल्यासारखे प्रश्न विचारले
ऑफिशियल सिक्रेसी अॅक्ट लागू होतो का याबाबत मी बोलणार नाही. मात्र, यावर व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन अॅक्ट लागू व्हायला हवा.
मी जबाबदार व्यक्ती सारखा वागलो. मी त्यासंदर्भातील ट्रान्सस्क्रीप्ट आणि पेनड्राईव्ह मी केंद्रीय गृहसचिव यांना दिली.
-
फडणवीसांची जबाब नोंदणी पूर्ण
फडणवीसांची जबाब नोंदणी पूर्ण
तब्बल दोन तास फडणवीसांची चौकशी
डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांच्या पथकाने केली चौकशी
पोलीस पथक सागर बंगल्यातून बाहेर पडले
-
-
देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी अनेकदा नोटीस दिलेली : दिलीप वळसे पाटील
मी आपल्याला सांगू इच्छितो की परिस्थिती समजून घेतली पाहिजे
हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे 26 मार्च 2021 रोजी दाखल
अज्ञात इसमानं राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गोपनीय माहिती प्राप्त केली
राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्यानं हा गुन्हा नोदं करण्यात आला
भारतीय टेलिग्राफ कायदा, गोपनीयता कायदा याअतंर्गत गुन्हा दाखळ झाला
5 जणांवर गुन्हा दाखल झाली आहे
आतापर्यंत 26 जणांचे जबाब नोंदवले
यापूर्वी अनेकदा नोटीस बजावण्यात आलं होतं
नोटीस म्हणजे समन्स नव्हे
देवेंद्र फडणवीस यांनी कोणती माहिती द्यायची कोणती नाही हा त्यांचा अधिकार आहे
यापूर्वी फडणवीस यांना नोटीस पाठवली होती त्यावेळी त्यांना प्रश्नावली पाठवली होती. प्रश्नावलीची उत्तर त्यांनी दिली नव्हती
त्यामुळं आज पोलीस त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेत आहेत
-
पोलीस बदल्यांचा अहवाल लीक प्रकरण; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील लाईव्ह
पोलीस बदल्यांचा अहवाल लीक प्रकरण
देवेंद्र फडणवीस यांना पाच ते सहावेळा नोटीस – वळसे पाटील
माहिती लिक कशी झाली याची चौकशी
प्रश्नावलीची उत्तरे न आल्याने पोलीस फडणवीसांच्या घरी पोहोचले – वळसे पाटील
पूर्वी याच संदर्भात प्रश्नावली पाठवण्यात आली होती, उत्तरे मिळाली नाही.
फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही – वळसे पाटील
या प्रकरणात फडणवीसांचा जबाब महत्त्वाचा
फडणवीसांच्या जबाबामुळे तपास थांबला होता
त्यामुळे पोलीस जबाब नोंदवण्यासाठी फडणवीसांच्या घरी – पाटील
या प्रकरणात पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
-
एक तासापासून फडणवीसांची चौकशी सुरूच, नितेश राणेंचा महाविकास आघाडीला टोला
फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गेल्या एक तासापासून चौकशी सुरूच आहे. दरम्यान यावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न करा आम्ही तोंड उघडणारच असे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
-
देवेंद्र फडणवीसांची अर्ध्या तासापासून चौकशी सुरूच
देवेंद्र फडणवीसांची अर्ध्या तासापासून चौकशी सुरूच
चौकशीसाठी पोलीस पथक सागर बंगल्यावर
भाजप नेत्यांची देखील सागर बंगल्यावर बैठक
नोटीसीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा
-
कायदा कायद्याचे काम करत आहे, आम्ही यंत्रणेचा कुठल्याही प्रकारे चुकीचा वापर करत नाहीत, मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण
-
नितेश राणेंचा भाजपावर निशाणा
नितेश राणे देखील सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यांनी या चौकशीवरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही जेवढं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढं जास्त आम्ही तोंड उघडू, असा इशारा नितेश राणे यांनी माहाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
-
संजय राऊतांचा चौकशीवरून भाजपावर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांची पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आल्याने आज राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. तसेच सागर बंगल्याबाहेर देखील भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. आता या सर्व प्रकरणानरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे. ‘कमाल आहे काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडापोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022
-
पोलिसांचं पथक ‘सागर’ बंगल्यावर दाखल; फडणवीसांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात
फडणवीसांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात
चौकशी पथकाकडून फडणवीसांना विविध सवाल
भाजपाच्या प्रमुख नेत्यांची वर्षावर उपस्थिती
जनतेला सरकारचा फोनपणा लक्षात आला
जनता महाविकास आघाडी सरकारला सोडणार नाही
दरेकर यांची आजच्या चौकशीवर प्रतिक्रिया
-
पोलिसांकडून देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीला सुरुवात
सागर बंगल्यात पोलिसांकडून देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीला सुरुवात
एसीपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक करत आहेत चौकशी
भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांची बंगल्याबाहेर गर्दी
चौकशीपूर्वी फडणवीसांची भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसोबत चर्चा
-
पोलिसांचे पथक फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल
फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सागर बंगल्यावर पोलीस पथक दाखल
बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर बंगल्याबाहेर हजर
-
चंद्रकांत पाटील लाईव्ह
उद्या पुन्हा दुसरा व्हिडीओ बॉम्ब पहायला मिळेल
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य
केंद्रयी यंत्रणांचा कुठेही गौरवापर नाही – पाटील
अनिल देशमुखांना जामीन मिळाला नाही म्हणून ते तुरुंगात
याचा अर्थ असा नाही भाजपाने कोर्ट विकत घेतली – पाटील
-
औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीस प्रकरणात आज राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर आले असून, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.
-
चंद्रशेखर बावनकुळे लाईव्ह
फडणवीस यांनी आता एकच बॉम्ब टाकला अजून ब्रम्हास्त्र बाकी आहे
आमच्या नेत्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही
आता खऱ्या लढाईला सुरुवात झाली आहे
एका सरकारी अधिकाऱ्याने ऑडिओ क्लिप बनविली आणि ती सरकारकडे दिली
चार राज्यात भाजपाची सत्ता आल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राजकारण – बावनकुळे
-
सोलापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी केली नोटीशीची होळी
सोलापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी केली नोटीशीची होळी
देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटीशीविरोधात भाजपचे पदाधिकारी आक्रमक
सोलापूर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करत नोटीशीची होळी
-
भाजपा कार्यकर्त्यांना उद्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश
भाजपा कार्यकर्त्यांना उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश
पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात न घेता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे दिले आदेश
नोटीसीची पुण्यात कार्यकर्त्यांकडून होळी
-
देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या नोटिशीची ठाण्यात होळी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या नोटिशीची ठाण्यात होळी
ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे व आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
भाजप नगरसेवक व पदाधिकारी आंदोलनात सहभागी
आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
-
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सागर बंगल्यावर पोहोचले
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आजच्या भाजप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.
-
देवेंद्र फडणवीस यांना बाजवलेल्या नोटीसीची औरंगाबादेत होळी
देवेंद्र फडणवीस यांना बाजवलेल्या नोटीसीची औरंगाबादेत होळी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने केली जातेय नोटीसीची होळी
औरंगाबादच्या क्रांती चौकात नोटीसीची होळी
नोटीसीची होळी करण्यासाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते क्रांती चौकात दाखल
राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
-
पुणे महापालिकेसमोर भाजपाचे आंदोलन
फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान यामुळे भाजप आक्रमक झाले असून, पुणे महापालिकेसमोर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
-
राष्ट्रवादीचा सटच खराब, बोंडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीच्या पार्श्वभूमीर नागपुरात भाजपाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजपा नेते अनिल बोंडे देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचा सटच खराब आहे, आता त्यात शिवसेनेचा देखील समावेश होतो. आम्ही फडणवीसांसोबत असल्याचे बोंडे यांनी म्हटले आहे.
-
अनिल बोंडे आंदोलनात सहभागी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस
फोन टॉपिंग प्रकरणात नोटीस
नागपुरात भाजपाचे आंदोलन
माजी मंत्री भाजप नेते अनिल बोंडे आंदोलनात सहभागी
Published On - Mar 13,2022 10:55 AM