Police News: पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती! गृहखात्याचा अजब कारभार, कुणाचं प्रमोशन थांबवलं?

बुधवारी (20 एप्रिल) रात्री गृह खात्याने काढलेल्या पदोन्नतीच्या आदेशाला आज (गुरुवारी, 21 एप्रिल) सकाळी स्थगिती दिली.

Police News: पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती! गृहखात्याचा अजब कारभार, कुणाचं प्रमोशन थांबवलं?
पोलिसांबाबतची मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 10:19 AM

मुंबई : अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती (Police promotion order) आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला होता. तो काही तासातच मागे घेण्यात आला आहे.  त्यामुळे गृहखात्याचा (Maharashtra Home Department) अजब कारभार उघडा पडलाय. बुधवारी (20 एप्रिल) रात्री गृह खात्याने काढलेल्या पदोन्नतीच्या आदेशाला आज (गुरुवारी, 21 एप्रिल) सकाळी स्थगिती दिली. मुंबई आणि ठाणे मधील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आदेशाला स्थगिती (Stay order) देण्यात आली आहे. पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. या पाच जणांमध्ये राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे यांचं नाव आहे. या पाचही जणांना देण्यात आलेली पदोन्नती पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अवघ्या काही तासांच्या आत पदोन्नतीचा निर्णय का स्थगित करण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, बदलीचा आदेश आहे, तसाच ठेवण्यात आला आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कुणाला कुठे पदोन्नती?

बदली करण्यात आलेल्यांची नावं आणि त्यांना देण्यात आलेली पदोन्नती काय होती?, यावरही एक नजर टाकुयात…

  1. राजेंद्र माने – विद्यमान पदस्थापना – उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई पदोन्नतीने पदस्थापना – अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर
  2. महेश पाटील – विद्यमान पदस्थापना – पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार- पोलीस आयुक्तालय पदोन्नतीने पदस्थापना – अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक), बृहन्मुंबई
  3. संजय जाधव – विद्यमान पदस्थापना – पोलीस आधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे पदोन्नतीने पदस्थापना – अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर
  4. पंजाबदार उगले – विद्यमान पदस्थापना – पोलीस अधीत्रक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे पदोन्नतीने पदस्थापना – अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस, बृहन्मुंबई
  5. दत्तात्रय शिंदे – विद्यमान पदस्थापना – पोलीस अधीक्षक, पालघर पदोन्नतीने पदस्थापना – अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई

दिग्गजांची बदली

राज्यातील मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश बुधवारी देण्यात आला होता. त्यात अनेक दिग्गज अधिकाऱ्यांची नावं होती. मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पिंपरी चिंडवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली होती. हा बदली आदेश तसाच कायम ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी काही दिवसांपूर्वीच बदलीची मागणी केली होती. घरगुती कारणांमुळे बदली करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार आता त्यांची बदली करण्यात आली. नाशिक पोलीस आयुक्त आता दीपक पांडेय यांच्या यागी जयंत नाईकनवरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचेपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता अंकुश शिंदे हे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. तर कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक VIP सुरक्षा, मुंबई इथं बदली करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ : पोलीस अधिकारी दीपक पांडेय यांची बदलीच्या आदेशावर पहिली Exclusive प्रतिक्रिया

संबंधित बातम्या :

Nashik : भोंग्याबाबत नवे साहेब निर्णय घेतील; मी नाशिकला पोलीस आयुक्त होतो हे विसरून जाणार, काय म्हणाले पांडेय?

Samrudhi Highway | उद्घाटनापूर्वीच आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून चालविली कार, समृद्धीवरील प्रवासाने वादाची शक्यता

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.