भाजपचा प्रचार करणारा कुत्रा ताब्यात
नंदूरबार : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या टप्प्यातील मतदान सुरु असताना, पोलिसांनी प्रचार करणाऱ्या अनेकांवर कारवाई केली. मात्र नंदूरबारमध्ये पोलिसांनी प्रचार करणाऱ्या एका कुत्र्यावर कारवाई केली आहे. यामुळे नंदुरबारमधील पोलीस सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. चौथ्या टप्प्यात नंदूरबारमध्ये मतदान पार पडलं. यावेळी एकनाथ मोतीराम चौधरी (65) हे […]
नंदूरबार : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या टप्प्यातील मतदान सुरु असताना, पोलिसांनी प्रचार करणाऱ्या अनेकांवर कारवाई केली. मात्र नंदूरबारमध्ये पोलिसांनी प्रचार करणाऱ्या एका कुत्र्यावर कारवाई केली आहे. यामुळे नंदुरबारमधील पोलीस सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
चौथ्या टप्प्यात नंदूरबारमध्ये मतदान पार पडलं. यावेळी एकनाथ मोतीराम चौधरी (65) हे नवनाथनगर येथे आपल्या कुत्र्याला घेऊन अंधारे परिसरात फिरत होते. त्यावेळी चौधरी यांच्या कुत्र्याच्या अंगावर भाजप आणि कमळाचे स्टिकर चिटकवण्यात आले होते. विशेष म्हणजे ‘मोदी लाओ देश बचाओ’ असं घोषवाक्या कुत्र्याच्या अंगावर लिहिलं होतं.
यावेळी काही नागरिकांनी नंदुरबार परिसरात मतदानदिवशी एक व्यक्ती कुत्र्याच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, कुत्रा आणि त्याच्या मालकाला अटक केली.
दरम्यान सध्या एकनाथ चौधरी पोलिसांच्या ताब्यात आहे. तर त्यांच्या कुत्र्याला महानगर पालिकेच्या ताब्यात सोपवलं आहे. निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच अशी अनोखी कारवाई केल्याने सध्या सर्वत्र याबाबत चर्चा रंगली आहे.