चाळीसगावात ग्रामपंचायत निकालाचा राडा, ऐन गुलालात लाठ्या काठ्यांची उधळण

निवडणुकीच्या वादातून चाळीसगाव तालुक्यातील लांबे वडगाव येथे दोन गटात दंगल उसळली.

चाळीसगावात ग्रामपंचायत निकालाचा राडा, ऐन गुलालात लाठ्या काठ्यांची उधळण
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 12:21 PM

जळगाव : चाळीसगावातल्या लांबे वडगाव गावात राजकीय राडा झालेला पाहायला मिळाला. एकीकडे गुलालाची उधळण सुरु असताना दुसरीकडे मात्र लाठ्या-काठ्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. निवडणुकीच्या निकालानंतर हा सगळा राडा झाला. (political Rada And Fighting attack on another group keeping in mind the election defeat)

निवडणुकीच्या वादातून लांबे वडगावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांमधील जवळपास पंधरा जण जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी मेहुणबारा पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींमधील 2 जण गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून कळते आहे.

लांबे वडगावच्या हर्षल राजपूत यांच्याविरोधात मानसिंग राजपूत यांचे पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे होते. या निवडणुकीत मानसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. त्याचा राग मनात ठेऊन मानसिंग राजपूत यांच्या गटाने हर्षल राजपूत यांच्या घरावर हल्ला चढवत त्यांच्या संपूर्ण परिवाराला झोडपून काढले.

दोन गटात झालेल्या मारामारीत लाकडी दंडुके, लोखंडी रॉड, तलवार अशा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. तसंच दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांच्या अंगावर दगड-विटा भिरकावल्या. या घटनेत दोन्ही गटामधील 15 जण जखमी झाली आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेतील गंभीर जखमींवर चाळीसगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. जयंत देवरे जखमींवर उपचार करत आहेत. तर अति गंभीर रुग्णांना धुळ्यातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नेमका काय प्रकार?

लांबे वडगावच्या हर्षल राजपूत यांच्याविरोधात मानसिंग राजपूत यांच्या पॅनेलमध्ये ग्रामपंचायतीची थेट लढत झाली. या लढतीत मानसिंग राजपूत यांच्या पॅनलचा पराभव झाला. याचाच राग मनात ठेऊन मानसिंग राजपूत यांच्या गटाने हर्षल राजपूत यांच्या घरावर हल्ला चढवत त्यांच्या संपूर्ण परिवाराला झोडपून काढले. याचं रुपांतर पुढे दोन्ही गटात तुंबळ हाणामारीत झालेलं पाहायला मिळालं.

पोलिसांकडून 23 जणांवर गुन्हा तर 9 जणांना अटक

घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव पोलिसांनी मानसिंग पाटील यांच्या गटातील 23 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात सोमसिंग देवसिंग पाटील,हेमंत विजयसिंग पाटील,भगवान भिमसिंग पाटील, सुमेरसिंग भीमसिंग पाटील, निलेश विजयसिंग पाटील, अरुण भीमसिंग पाटील, महेंद्र अजयसिंग पाटील, रवींद्र बालु पाटील यांचा समावेश आहे

याप्रकरणी हर्षल राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम भारतीय दंड विधान संहिता कलम 307, कलम 324, कलम 143, कलम 144, कलम147, कलम 148, कलम 149, कलम 188, भारतीय शस्त्र अधिनियम 4/25, जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी 37 (1) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Riots in Chalisgaon, attack on another group keeping in mind the election defeat)

हे ही वाचा

चंद्रपुरात येणारा 50 लाखांचा दारुसाठा आमदाराने पकडला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

मोबाईल न दिल्याचा राग, मुलाकडून बापाच्या डोक्यात चोपणीने वार

अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार, 33 नराधमांना अटक, धक्कादायक प्रकार

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.