Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 1:49 PM

सोलापूर: शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. (pomegranate and grapes damaged due to rain in pandharpur)

पावसाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्याला देखील झोडपून काढले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी फळबागांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंढरपूर तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसामुळे भीमा नदी गेले चार महिने नियमितपणे दुथडी भरून वाहत आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले असून पावसाने तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. अनेक भागात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे मका, बाजरी या पिकांसह भाजीपाला आणि केळी पपई ,डाळिंब, द्राक्षे या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळं फळबागांना फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यानं भोगावती नदीला पूर आला आहे. हिंगणी प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या:

सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो,  भोगावती नदीला पूर

महाराष्ट्रावर आसमानी संकटाची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

(pomegranate and grapes damaged due to rain in pandharpur)

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.