पुजा आणि कथित मंत्र्यांचा शेवटचा संवाद कोणता? मंच्युरियन, ज्यूस आणि बरंच काही, ऐका, वाचा !

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप बाहेर आल्यात. (Pooja Chavan Death Last Audio Clip)

पुजा आणि कथित मंत्र्यांचा शेवटचा संवाद कोणता? मंच्युरियन, ज्यूस आणि बरंच काही, ऐका, वाचा !
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 8:15 PM

बीड : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप बाहेर आल्यात. त्यातल्या सर्वच्या सर्व क्लिप आम्ही आपल्याला ऐकवल्या आहेत आणि त्याचं शब्दांकनही केलेलं आहे. त्यातलीच एक क्लिप आहे ती एका मुलीची आणि कथित मंत्र्यांच्या संवादाची. मिळत असलेल्या माहितीनुसार मुलीचा आवाज हा दुसरा तिसऱ्या कुणाचा नसून ती पुजा आहे. (Pooja Chavan Death Last Audio Clip With Minister)

काय आहे कथित मंत्री आणि त्या मुलीच्या संवादात?

ही क्लिप 1 मिनिट 31 सेकंदाची आहे. त्यात हा मंत्री मुलीला कन्व्हिन्स करण्यासाठी अरुणला सांगत आहे. त्यात एका मुलीचा आवाजही येतो. तीही या मंत्र्याशी बोलते. ही मुलगी मंत्र्याला जेवण झालं का विचारत आहे. बहुतेक ती पूजा असावी. तर मंत्री तिला ज्यूस किंवा मंच्युरिअन आणून खायला सांगत आहे. मुलगीही या मंत्र्याला पटकन यायला सांगत आहे. त्यानंतर मंत्रीही तिला होकार देतात.

बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या या क्लिप्स आहेत.

अरूण राठोड असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच तो या मुलीचा चुलत भाऊ असल्याचंही त्या कार्यकर्त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. पूजाच्या आत्महत्येपूर्वीपासून ते आत्महत्येनंतरचं संभाषण या क्लिपमध्ये आहे. त्यातून पूजा कोणत्या मानसिकतेत होती आणि ती कसली तरी ट्रीटमेंट घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.

पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्याने तिच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पूजाच्या आत्महत्येमागे काही काळंबेरं आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यातच एका मंत्र्यांचं आणि त्याच्या कार्यकर्त्याचं कथित संभाषण व्हायरल झाल्याने त्यावर अधिकच तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या क्लिप्समध्ये पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, तिची कसली तरी ट्रीटमेंट सुरू होती आणि या मंत्र्यांचं या संपूर्ण प्रकरणाशी कसलं तरी कनेक्शन होतं, असं स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीची मागणी होत आहे.

मंत्री नेमकं काय म्हणाले? 

कथित मंत्री आणि त्याच्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याची ही 12 मिनिटाची क्लिप आहे. या क्लिपमध्ये मंत्री वैतागलेले दिसत आहेत. टेन्शनमध्ये असल्याचं ते सांगत आहेत. मंत्री: मला एक तर टेन्शन… टेन्शन आलंय. आधीच मी परेशान आहे. घराचं टेन्शन आहे. समजव तिला. तूच तिला कन्व्हिन्स करू शकतो. अरुण: काही तरी मार्ग काढावा लागेल. मंत्री: कन्व्हिन्स कर तू. अरुण: कन्व्हिनस करावं लागेल, अवघड विषय आहे,. मागे लागेल… मी जातो आणि व्यवस्थित बोलतो. मंत्री: ठिक आहे. तू कर नंतर मी येतो. त्यानंतर या दोघांमध्ये मुलीच्या ट्रिटमेंटबाबत चर्चा सुरू होते. त्यावर अरुण ही मुलगी सर्किट असल्याचं सांगतो. मग मंत्री तिला गोडीत समजावण्याचं अरुणला सल्ला देतात. त्यावर हा बदनामीचा धंदाच आहे, असं अरुण म्हणतो. अरुणच्या या उत्तराने मंत्री अधिकच वैतागतात. माझ्या घरी काय चालू आहे माझं मलाच माहीत. घर डिस्टर्ब झालंय माझं. मला माहीत मी किती परेशान आहे. तिला समजाव तू, असं हा मंत्री म्हणतो. त्यावर तुमचं रेप्युटेशन आहे. हे तिला कळलं पाहिजे, असं अरुण म्हणतो. मंत्री: मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. अरुण: तुम्ही काही करणार नाही. मी बघतो परिस्थिती हाताळतो. मंत्री: तूच काही तरी कर, मी काही करत नाही. अरुण: मी करतो कन्व्हिन्स (Pooja Chavan Death Last Audio Clip With Minister)

संबंधित बातम्या :

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी बहिणही सरसावली, इन्स्टावर भावूक पोस्ट, माझी बहिण वाघिण होती

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.