पूजाच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना धक्का, वडील म्हणाले…

परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. | Pooja Chavan

पूजाच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना धक्का, वडील म्हणाले...
पूजा चव्हाण ही तरुणी मूळची परळी येथील रहिवासी आहे भावासोबत पुणे येथे राहत असताना तिचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला तिची हत्या की आत्महत्या अद्याप अस्पष्ट आहे.
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 7:16 PM

बीड: परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी व्हावी, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र पूजा चव्हाण हिचे कुटुंब नि:शब्द आहेत. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, एवढीच मागणी पूजाचं कुटुंबीय करत आहेत. (Pooja Chavan suicide case fathers demand probe)

पूजा चव्हाण ही तरुणी मूळची परळी येथील रहिवासी आहे भावासोबत पुणे येथे राहत असताना तिचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला तिची हत्या की आत्महत्या अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणात मयत पूजा हीच कुटुंब काही बोलायला तयार नाही. परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा एवढीच मागणी पूजाच्या वडिलांनी केली.

उद्या समाजाची बैठक

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बीडमध्ये उद्या समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. या मृत्यू प्रकरणात अनेक राजकीय नेते गोवणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे उद्या समाजाच्या या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे: पंकजा मुंडे

पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकीय वादात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उडी घेतली आहे. पूजा चव्हाण (Pooja Chavan) ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली. या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

संंबंधित बातम्या :

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप आक्रमक, संबंधित मंत्र्याचं ‘राठोडगिरी’ असं नाव घेत पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

(Pooja Chavan suicide case fathers demand probe)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.