पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडचा शोध सुरु, बीडमध्ये लपल्याची माहिती

बीड : राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाच्या 11 क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या कथित ऑडिओ क्लिपमधील अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. (Pooja chavan suicide case : Police Searching Arun Rathod Main […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडचा शोध सुरु, बीडमध्ये लपल्याची माहिती
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 4:29 PM

बीड : राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाच्या 11 क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या कथित ऑडिओ क्लिपमधील अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. (Pooja chavan suicide case : Police Searching Arun Rathod Main Suspect)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुण पोलिसांकडून सध्या अरुण राठोडचा शोध सुरु आहे. अरुण राठोड हा सध्या बीडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

कोण आहे अरुण राठोड?

अरुण राठोड हा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा चेहरा असल्याचे मानलं जात आहे. ज्यावेळी पूजाने आत्महत्या त्यावेळी अरुण राठोड हा उपस्थित होतो. तो मूळ परळी तालुक्यातील धारावती तांडा या ठिकाणी राहत होता.

पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी अरुण राठोड याच्याकडे सोपवण्यात आली होती. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण याचे कोणतेही रिलेशन नाही. ते नातेवाईक नसल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे अरुण राठोडला सर्वात आधी अटक करावी, अशी मागणी पूजा चव्हाण यांच्या परळीतील नातेवाईकांनी केली आहे. अरुण राठोडला अटक झाल्यानंतर पूजाने नेमकं आत्महत्या का केली? हे प्रकरणं काय आहे? याला संजय राठोड जबाबदार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तर समोर येणार आहेत.

याचा तपास पुणे पोलीस करत आहे. परळीत अद्याप एकाही पोलिसाचं पथक आलेले नाही. मात्र पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली, तर कदाचित अरुण राठोडचा तपास लवकर लागेल, असे बोललं जात आहे. पोलिसांनी यावेळी बीडकडे जर लक्ष दिलं तर अरुण राठोडला लवकरात लवकर अटक केली जाईल, असे बोलले जात आहे.

नेमकं प्रकरणं काय?

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

भाजपकडून थेट वन मंत्र्याचं नाव

भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. (Pooja chavan suicide case : Police Searching Arun Rathod Main Suspect)

संबंधित बातम्या : 

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचं: दीपक केसरकर

संजय राठोडांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीप्स बनावट; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा दावा

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.