संजय राठोडांची पोहरादेवीला येण्याची वेळ ठरली; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. | Sanjay Rathod

संजय राठोडांची पोहरादेवीला येण्याची वेळ ठरली; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
शिवसेना नेते संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 8:16 AM

वाशिम: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडेअकराच्या सुमारास संजय राठोड याठिकाणी येतील, अशी माहिती समोर आली आहे. (Shivsena leader Sanjay Rathod will visit pohradevi temple today)

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे:

1. संजय राठोड हे सकाळी साधारण 9 वाजता आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील. 2. सकाळी 11.30 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील. 3. दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील. 4. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील. 5. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील. 6. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.

पोलिसांची पोहरादेवी संस्थानला नोटीस

संजय राठोड पोहरादेवी येथे आल्यानंतर मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पोहरागडावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. येथे कोणत्याही कार्यक्रमाला फक्त 50 जणांना जमण्याची परवानगी आहे. पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला तशी नोटीसही बजावली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मार्गावर कसून तपासणी केली जात आहे.

तब्बल 15 दिवसांनंतर राठोड सर्वांसमोर येणार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर टोकाची टीका होत आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर ते अज्ञातवासात होते. त्यांचा नेमका पत्ता कोणालाही माहिती नव्हता. त्यामुळे या प्रकरणावर राठोड यांचे कोणतेही स्पष्टीकरण न आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या पार्श्वभूमीवर तब्बल 15 दिवसांनंतर राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येत आहेत. ते मंगळवारी पोहरा गडावर जाऊन पोहरादेवीचे दर्शन घेणार आहेत.

दरम्यान, राठोड यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आनेक चर्चांना उधाण आले आहे. आता मंगळवारी पोहरादेवी गडावर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संजय राठोड शक्तिप्रदर्शन करून नेतृत्वावर दबाव आणतील, अशीही चर्चा

पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड मंगळवारीच पोहरादेवी इथं सर्वांसमोर येणार आहेत. राठोड शक्तिप्रदर्शन करून नेतृत्वावर दबाव आणतील, अशीही चर्चा आहे. मात्र पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला एक नोटीस बजावलीय. ज्यात फक्त 50 लोकांनाच कार्यक्रमावेळी हजर राहण्याची परवानगी दिलीय. त्यामुळे पोहरादेवीत राठोड आपली भूमिका कशा प्रकारे स्पष्ट करतात आणि नोटीस बजावल्याप्रमाणे फक्त 50 जण उपस्थित राहतात, बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी इथं बंजारा समाजाचे लोक गर्दी करणार, हे राठोड आल्यावरच कळणार आहे.

महंत दुपारी संवाद साधणार

कोरोनाचा संसंर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर संजय राठोड समर्थक मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल करत आहेत. त्यामुळं पोहरादेवी येथे गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी बजावलेली नोटीस बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना मिळाली आहे.

बाबूसिंग महाराज उपस्थित राहणार

बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे संजय राठोड यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र महाराज कर्नाटकमध्ये असून ते उद्या पोहरादेवी येथे हजर राहणार आहेत, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

PHOTO | गबरु, केक आणि बरंच काही, पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा

Sanjay Rathod | शिवसेना नेते संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(Shivsena leader Sanjay Rathod will visit pohradevi temple today)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.