शिंदे गट आणि भाजप भिडण्याची शक्यता, हे आहे कारण

सत्तेत असलेल्या भाजपने जवळपास 400 ते 500 टक्क्यांनी घरपट्टीमध्ये वाढ केल्याने 35 ते 40 हजार रुपयांची घरपट्टी भरण्याची वेळी नाशिककरांवर आली आहे.

शिंदे गट आणि भाजप भिडण्याची शक्यता, हे आहे कारण
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 1:06 PM

नाशिक : राज्यामध्ये सध्या शिंदे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार सुरू आहे. मात्र, सगळं काही आलबेल असल्याचे सांगितले किंवा दाखविले जात असले तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात सगळं काही आलबेल नाहीये अशी चर्चा आहे. त्यातच पालकमंत्र्यांच्या नावाच्या घोषणा करतांना शिंदे यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांचेच नाव असेल अशी चर्चा असतांना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे भाजपमधील एक गट नाराज असल्याचे बोललं जात आहे. त्यातच नुकतीच दादा भुसे यांनी नाशिक महानगर पालिकेत (NMC) आढावा बैठकी दरम्यान भाजपने केलेली घरपट्टीची करवाढ रद्द करणार असल्याची लेखी आश्वासनात म्हंटल आहे. त्यामुळे भाजपवर ही कुरघोडी केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

नाशिक महानगर पालिकेत 2017-18 मध्ये भाजपची सत्ता होती. त्यात शिवसेना ही विरोधी बाकावर होती.

सत्तेत असलेल्या भाजपने जवळपास 400 ते 500 टक्क्यांनी घरपट्टीमध्ये वाढ केल्याने 35 ते 40 हजार रुपयांची घरपट्टी भरण्याची वेळी नाशिककरांवर आली आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घरपट्टीचा मुद्दा देखील चर्चेत आला होता. त्या दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत भुसे यांना माहिती दिली आहे.

याच मुद्द्यावरून दादा भुसे यांनी शासन दरबारी हा मुद्दा घेऊन जात वाढ केलेली करवाढ रद्द केली जाईल असे नमूद करत नाशिककरांना एकप्रकारे दिलासा देण्याचे काम केले जाणार आहे.

आता भाजपने घेतलेला हा घरपट्टीचा मुद्दा शिंदे गटाकडून रद्द करण्याची तयारी केली जाणार असल्याने एक प्रकारे शिंदे गटाची भाजपवर कुरघोडी असल्याचे बोलले जात आहे.

एकूणच शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांकडून घेतलेली भूमिका पाहता शिंदे आणि फडणवीस यांच्यात आलबेल असे वातावरण नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

त्यातच अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने गिरीश महाजन यांच्या ऐवजी दादा भुसे यांच्या नावाची घोषणा झाल्याने शिंदे यांचाच सत्तेत वरचष्मा असून फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.