कोकणवासियांनो कंबर सांभाळा! गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचा मार्ग खडतर; मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, व्हिडीओ पाहाच

यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांनी आपली कंबर आणि मणका सांभाळणं गरजेचं आहे! याचं कारण मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय.

कोकणवासियांनो कंबर सांभाळा! गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचा मार्ग खडतर; मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, व्हिडीओ पाहाच
मुंबई गोवा हायवेवर खड्ड्यांचं साम्राज्यImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 7:19 PM

मुंबई : कोकणवासियांसाठी गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हणजे हक्काचा आणि महत्वाचा उत्सव. राज्याच्या कानाकोपऱ्यात असणारे कोकणवासिय (Kokan) गणेशोत्सवासाठी आपलं घर गाठतात. मुंबई, पुण्यातूनही लाखो लोक गणपतीच्या काळात कोकणात जात असतात. ज्यांच्याकडे स्वत:ची गाडी असते ते आपल्या वेळेनुसार गाव गाठतात. मात्र, ज्यांच्याकडे गाडी नाही अशांसाठी राज्य सरकारकडून एसटी बसेसची सोय केली जाते. जूनपासूनच एसटी महामंडळ आणि परिवहन विभाग (Transport Department) याकामी लागलेलं असतं. त्यानुसार यंदाही बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांनी आपली कंबर आणि मणका सांभाळणं गरजेचं आहे! याचं कारण मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय.

महामार्गावर वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार

मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी अनेक मोठाले खड्डे पडले आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या तयारीसाठी एसटी आणि खासगी वाहतूक सज्ज झालीय. मात्र अजुनही मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. खड्ड्यांमुळे केवळ तुमची पाठ रिकामी होणार नाही तर तुम्हाला मोठ्या वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा कधी संपणार?

पनवेलपासून मुंबई गोवा महामार्ग सुरु होतो. पनवेलमधीलच पळसपे फाट्याजवळ मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा पाहायला मिळत आहे. ड्रोनद्वारे टिपलेल्या दृष्यांमध्ये महामार्गावर पावलो पावली मोठाले खड्डे पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हालचाली करुन कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्याची गरज आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.