Aaditya Thackeray: सत्ता येते जाते, इथून पुढे जिंकायचं आहे, आदित्य ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना आवाहन, भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे

| Updated on: Jun 24, 2022 | 3:07 PM

आपल्याला सहानभूती नको आहे, पुन्हा संघर्ष करु आणि जिंकून येऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगि्तल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. या संभाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

Aaditya Thackeray:  सत्ता येते जाते, इथून पुढे जिंकायचं आहे, आदित्य ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना आवाहन, भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे
Uddhav-Aaditya what went wrong
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई– सत्ता येते, जाते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जनतेसाठी काम केले आहे. आम्हाला अनेक जणांचे फोन येत आहेत, राज्यातील जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्यासोबत आहे. आपल्याला सहानभूती नको आहे, पुन्हा संघर्ष करु आणि जिंकून येऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगि्तल्याचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी सांगितले आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांना (Shivsena)केलेल्या मार्गदर्शनावेळी ते बोलत होते.  संभाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

महत्त्वाचे मुद्दे

  1.  कुटुंबप्रमुखाला धोका देता, त्याचे वाईट वाटते.
  2. अनेकांना सत्तेचा मोह मात्र आम्हाला तो मोह झाला नाही.
  3.  सत्ता तीन महिने राहू द्या, असे म्हणत होते, मात्र बॅगा भरायला सांगताच आम्ही त्वरीत मातोश्रीला आलो.
  4. धोका मित्रपक्षाने दिला असता तर समजू शकलो असतो, मात्र धोका कुणी दिला
  5.  ज्यांना तिकिट दिलं, ज्यांना मोठं केलं, त्यांनीच उद्धव ठाकरे यांना धोका दिला, याचे वाईट वाटते
  6.  २५ वर्ष विरोधात असलेल्या मित्रपक्षांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली.
  7.  आपल्याला कुणाची सहानभूती नको, उद्धव ठाकरेंनी सांगितले-आदित्य
  8.  कोविड वाढला , शस्त्रक्रिया झाली., तरी मुख्यमंत्री सहकार्य, मदत करीत होते.
  9.  राज्यातील सर्व जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आहे
  10.  वर्षा सोडताना सामान्यांच्या डोळ्यात पाणी होते.