‘करुणा ताई तुम्ही सुद्धा एक स्त्री…’, प्राजक्ता माळीचे भावनिक आवाहन

आज प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिष घेतली, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं. सोबतच करुणा शर्मा यांना देखील आवाहन केलं आहे.

'करुणा ताई तुम्ही सुद्धा एक स्त्री...', प्राजक्ता माळीचे भावनिक आवाहन
Follow us
| Updated on: Dec 28, 2024 | 6:56 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेला आज 19 दिवस झाले आहेत, मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, हे प्रकरण आमदार सुरेश धस यांनी चांगलंच उचलून धरलं, या प्रकरणात बोलताना सुरेश धस यांच्याकडून सातत्यानं आकावर आरोप करण्यात येत आहेत, मात्र हे आका कोण याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.

त्यांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. या प्रकरणावर बोलत असतानाच त्यांनी तीन अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख केला होता. यामध्ये एक नाव प्राजक्ता माळी यांचंं देखील आहे. त्यानंतर आज प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं आहे. सोबतच त्यांनी करुणा शर्मा यांना देखील आवाहन केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या प्राजक्ता माळी? 

तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं. त्यांनी कुत्सितपणे टिप्पणी करून या गोष्टीचा प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी गैरवापर केला आहे. हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. ही निंदणीय बाब असल्याचं प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की माझी आई दीड महिना झोपली नाही. माझ्या भावाने सोशल मीडियाचे सर्व अकाऊंट डिलीट केले. समाजात अशी प्रतिमा डागाळलं जाणं, एका मुलीची आणि त्यातही फिल्म क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींची हा किती गंभीर प्रकार आहे, हे तुम्ही समजून शकत नाहीत. तुम्ही या गोष्टींचं गाभीर्य ठेवलं पाहिजे.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. पुरावा असल्याशिवाय बेसलेस बातमी देऊ नये असे आदेश द्यावेत, असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना करुणा शर्मा यांना देखील आवाहन केलं आहे. मी करुणा ताईंनाही विनंती करू इच्छिते. तुम्ही महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुष प्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या पाठी नाही राहिल्या तर कसं होणार. माझ्याबाबतची जी माहिती मिळाली ती चुकीची आहे. तुमचा स्त्रोत चुकीचा आहे. कोणत्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय करुणा ताई तुम्ही असं करणार नाही, अशी विनंती करते, असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.