भाजपला लगीनघाई, पण बायको मिळेना, 1 तारखेपासून लॉकडाऊन मोडा : प्रकाश आंबेडकर

1 तारखेपासून लॉकडाऊन पाळू नका,सर्व व्यवहार सुरु करा,असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं. ते औरंगाबादेत बोलत होते. (Break the lockdown appeal Prakash Ambedkar)

भाजपला लगीनघाई, पण बायको मिळेना, 1 तारखेपासून लॉकडाऊन मोडा : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jul 31, 2020 | 5:40 PM

औरंगाबाद : “भाजपला लग्न करण्याची घाई झालीय, त्यांना बायको हवीय, पण ती भेटत नाही”, असा चिमटा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काढला. याशिवाय 1 तारखेपासून लॉकडाऊन पाळू नका, सर्व व्यवहार सुरु करा, असं आवाहन आंबेडकरांनी केलं. ते औरंगाबादेत बोलत होते. (Break the lockdown appeal Prakash Ambedkar)

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. त्याचवेळी त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनाही चिमटे काढले. “भाजपला लग्न करण्याची घाई झालीय, त्यांना बायको हवीय, पण ती भेटत नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सत्तास्थापनेसाठी भाजपला जोडीदार हवा आहे, त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी ही मिश्किल टीका केली.

‘लॉकडाऊन पाळू नका’

यावेळी त्यांनी शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, 1 तारखेपासून सर्व व्यवहार सुरु करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी जनतेला केलं. ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरी अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

केंद्र आणि राज्याकडे पॉलिटिकल गट्स किंवा त्यांची हिम्मत नाही. काही नेते हे जातीचे नेते आहेत, काही नेते धर्माचे नेते आहेत. शासनाचा रिपोर्ट आहे की कोरोनाविरोधात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, देशात पाच टक्के लोक हे व्हरनेबल कॅटगेरीत आहेत. या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवणं ही प्राथमिकता असली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

5 टक्के लोकांसाठी 95 टक्के लोकांना वेठीस धरणं हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. 5 टक्के लोकांना वाचवण्यासाठी इतर लोकांना आपण मारत आहोत अशी स्थिती आहे. काही लोक भूकबळीने मरत आहेत सर्वसामान्य माणसांना आवाहन आहे. की चक्रव्यूहात अडकलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला रस्ता दाखवण्याची गरज आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकांना विनंती आहे की 1 तारखेपासून सगळी दुकाने उघडी करा, रिक्षावाल्यांनी व्यवसाय सुरु करावेत, पब्लिक ट्रान्सपोर्टमधील लोकांनी कामावर हजर व्हावे. सरकारने 80 कोटी लोकांना अन्नधान्य दिल्याचा दावा केला, पण अन्नधान्य कुणालाही भेटलं नाही. वंचित बहुजन आघाडीची हाक, शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जनजीवन सुरळीत सुरु करा. रक्षाबंधनाला पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा सुरु करा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरीत, अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

(Break the lockdown appeal Prakash Ambedkar)

संबंधित बातम्या 

Prakash Ambedkar | “उद्धव ठाकरेंनी देव बनू नये”, प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

Prakash Ambedkar | … तर मोदींवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा : प्रकाश आंबेडकर 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.