सीव्होटरच्या सर्व्हेवर प्रकाश आंबेडकर यांचं थेट विश्लेषण, पण भाजपला लाईटली घेऊन नका असं आंबेडकर का म्हणाले ?
देशासह राज्यात आगामी काळात निवडणुकीचा कोणता ट्रेंड असेल यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे,
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीवर टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी काळातील देशासह राज्यात निवडणुकीचा ट्रेंड काय असेल यावर भाष्य केलं आहे. याशिवाय कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केल्यानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हंटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीवर भाष्य करत असतांना सीव्होटरचा सर्व्हेच्या सर्वेचा संदर्भ देऊन भाजपला लाईटली घेऊ नका असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. भाजप कशावर निवडणुका लढवत आहे, निवडणुकीत कसला वापर करीत आहे हे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगून टाकले आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये कोणतं सरकार येणार यावर आगामी निवडणुकीचा ट्रेंड असणार असंही आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची आणि उद्धव ठाकरे याणी भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, भाजपला आणि आरएसएसला लाईटली घेऊ नका असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. याशिवाय नुकताच सीव्होटरचा आलेला सर्व्हे खूप घाईत आला आहे असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
ईडी आणि सीबीआयचा वापर करून राज्या-राज्यामधील सत्ता टिकवण्याचा भाजपचा प्रयन्त असणार आहे असा थेट आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर आरोप केला आहे.
कर्नाटकचा निकाल हा देशामधील आगामी ट्रेण्ड असणार आहे, मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय त्यामुळे कर्नाटकची निवडणूक बघावी लागेल असेही आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
युती जाहीर झाल्यानंतर भाजपने ट्रोलिंग सुरू केले त्यावरून त्यांना किती मानसिक आणि मतांचा त्रास झाला आहे हे दिसतंय असा टोलाही भाजपला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलेली युती पुढे कशी जाईल हे तुम्ही बघत राहा असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगत देशातील निवडणुकीवर भाष्य केलं आहे.