Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hijab Controversy : हिजाब वादात प्रकाश आंबेडकरांची उडी! कायदा आणि संविधानाचा दाखला देत काय म्हणाले?

हिजाब घालून घोषणाबाजी करणारी मुस्कानही देशातल्या घराघरात पोहोचली आहे, महाराष्ट्रातही यावरून राज्यभर आंदोलनं झाली. याच वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे.

Hijab Controversy : हिजाब वादात प्रकाश आंबेडकरांची उडी! कायदा आणि संविधानाचा दाखला देत काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकरांची हिजाब वादात उडी
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 8:01 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून हिजाबवरून (Hijab Controversy) देशात मोठा गदारोळ सुरू आहे. कर्नाटकात (Karnataka Hijab dispute) सुरू झालेले या वादाचे लोन सध्या देशभर पसरले आहे. कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी (Muslim Girl) उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर कोर्टातही सुनावणी सुरू आहेत.कर्नाटक सरकारने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. यावरूनच हा वाद पेटला आहे. हिजाब घालून घोषणाबाजी करणारी मुस्कानही देशातल्या घराघरात पोहोचली आहे, महाराष्ट्रातही यावरून राज्यभर आंदोलनं झाली. याच वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी हिजाबच्या समर्थनार्थ कोर्टाला विनंती केली आहे.एवढेच नाही तर त्यांनी संविधान आणि कायद्याचाही दाखला दिला आहे.

प्रकाश आंबेडकरांचे ट्विट काय?

हिजाब वादावरून कोर्टाला विनंती करत आंबेडकर म्हणतात, आम्ही न्यायालयाला विनंती करतो की, ड्रेस कोडबाबत घटनेत किंवा कायद्यात कोणतीही तरतूद नाही यावर त्वरित निर्णय घ्यावा. लोकांना हवे ते परिधान करण्याचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने याची अंमलबजावणी करावी. हा निर्णय आला तर समाजात शांतता नांदेल, शांतता नांदेल, असे मला वाटते, आशा आशयाचे ट्विट आंबेडकरांनी केले आहे. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोशाखावर कर्नाटक उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व शिक्षण संस्था सुरु करा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हिजाब वादावर महाराष्ट्रातही आंदोलनं

मागे मालेगावात हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्याचे पहायला मिळाले. पोलिसांचा विरोध झुगारून कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली. हे आंदोलन करताना या महिलांच्या हातातील फलकांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण हे फलक उर्दूत होते. अहमदनगरला हिजाब प्रकरणी राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आल्याचेही दिसून आले. तर दुसरीकडे नगरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत हिजाबला विरोध करणाऱ्यांचा निषेध केला होता. या वादावर देशभरातील नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आता आंबेडकरांनी थेट कायद्याचा आणि संविधानाचा हवाला दिल्याने या प्रकरणात नवं ट्विस्ट येणार का? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी यशस्वी होणार? राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत काय? जाणून घ्या

तिसऱ्या आघाडीने काही फरक पडत नाही, येणार तर मोदीच-रामदास आठवले

Amit Thackeray | नवी मुंबईत मनसेच्या 3 नव्या शाखा, उद्घाटनासाठी अमित ठाकरेंची हजेरी!

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.