प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात एंट्री, शिंदेशाही पुन्हा धोक्यात

सोलापूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीतला वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कंबर कसली आहे. मात्र ऐनवेळी भाजपने कोणत्याही परिस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपली जागा कायम ठेवण्यासाठी डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजींना निवडणूक रिंगणात उतरवून शिंदेंच्या विजयाचा मार्ग खडतर केलाय. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. […]

प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात एंट्री, शिंदेशाही पुन्हा धोक्यात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

सोलापूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीतला वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कंबर कसली आहे. मात्र ऐनवेळी भाजपने कोणत्याही परिस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपली जागा कायम ठेवण्यासाठी डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजींना निवडणूक रिंगणात उतरवून शिंदेंच्या विजयाचा मार्ग खडतर केलाय. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनमोहन सिंग मंत्रिमंडळातील ज्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला, त्यातील एक नाव म्हणजे सुशीलकुमार शिंदे. कधीच पराभव न पाहिलेल्या सुशील कुमार शिंदेचा मोदींच्या लाटेत तब्बल दीड लाखांनी पराभव झाला. भाजपच्या शरद बनसोडे यांचा दीड लाखांच्या फरकाने विजय झाला. 40 वर्षाची शिंदेशाही संपली आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं.

ज्या अपेक्षेने मतदारांनी कमळ फुलविलं, त्या मतदारांचा मात्र अपेक्षाभंग झाला. साडे चार वर्षातील खासदार शरद बनसोडे यांची कामगिरी सुमार असल्याचं जनतेचं म्हणणं आहे. शिवाय पक्षश्रेष्ठीही बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. नेमके हेच हेरून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली, जनसंपर्क वाढवला. शरद बनसोडे हेच भाजपचे उमेदवार गृहीत धरून शिंदे यांनी आपला गेलेला गड पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एका अर्थाने शिंदे यांच्या विजयाचा मार्ग मोकळाही झाला होता. मात्र  पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून लिंगायत समाजाचे धर्मगुरु जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे नाव पुढे आणले. मतदार संघातील जातीय समीकरणे पाहता सिद्धेश्वर महास्वामीजींना मानणाऱ्यांची संख्या जास्त जास्त आहे. त्यामुळे विजयाच्या जवळ असणाऱ्या शिंदेची वाट बिकट झाली आहे.

जयसिद्धेश्वर महाराजांच्या संभाव्य उमेदवारीने शिंदेची वाट बिकट झालेली असतानाच त्यात आता भर पडलीय ती भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीच्या शक्येतची. सोलापूर राखीव मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची पहिली सभा घेऊन वातावरण निर्मितीसुद्धा चांगलीच केली. शिवाय मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अनुसूचित जाती, मुस्लीम यांची मतेही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंच्या हक्काची मते ही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात पडू शकतात. त्यामुळे शिंदेंना आपल्या पराभवाचा वाचपा काढण्याबरोबरच आपल्या हक्काची मते कशी रोखता येतील यासाठी कंबर कसावी लागणार असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जातं आहे. हे सर्व सुरु असताना त्याचा थेट फायदा भाजपाला होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

सध्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सुरु आहे. त्यामुळे विविध राजकीय समीकरणे समोर येत आहेत. ऐनवेळी सोलापूरच्या राजकारणात काहीही होऊ शकतं हे 2014 ला सर्वांनी पाहिलंय. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोण अधिकृत उमेदवाराला तिकीट देणार याची वाट पाहावी लागेल. मग त्या नंतरची समीकरणे काय असतील याची उत्सुकता लागली आहे. मात्र सध्या तरी शिंदेंच्या विजयाची वाट अवघड झाली आहे हे नक्की.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.