विजय वडेट्टीवार बिनडोक, लायकी काय?; प्रकाश आंबेडकर का संतापले?

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा धडाका सुरू आहे. ह्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 25 ऑक्टोबर रोजी अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

विजय वडेट्टीवार बिनडोक, लायकी काय?; प्रकाश आंबेडकर का संतापले?
Prakash AmbedkarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 6:50 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं धक्कादायक विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. वडेट्टीवार यांच्या या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. वडेट्टीवार बिनडोक आहेत. त्यांची लायकी काय आहे? ज्यांची कुवत नाही अशा लोकांना काँग्रेसने विरोधी पक्षनेता बनवलं आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? हे मूर्ख आहेत सगळे. यांना काय बाबासाहेब कळणार?, असा संतप्त सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी संविधान रॅली आयोजित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. येत्या 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कात ‘संविधान के सन्मान में’ या रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या रॅलीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आम्हाला शिवाजी पार्क पोलिस ठाण्यातून रॅलीसाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे. रॅलीसाठीचा वेळ कमी आहे. तरीही आम्ही राहुल गांधी यांना आमंत्रित करत आहोत. ते येतील अशी आशा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आंबेडकर आणि राहुल गांधी एकाच मंचावर येण्याची शक्यता बळावली आहे.

ठाकरे गटालाही निमंत्रण

या रॅलीसाठी ठाकरे गटालाही निमंत्रित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती आहे. त्यामुळे ठाकरे गटालाही रॅलीचं निमंत्रण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान वाचवणे हे राजकारणाच्या पलिकडे आहे, असे आमचे मत आहे, असंही ते म्हणाले.

तर स्वातंत्र्य धोक्यात येईल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर रोजी मसुदा समितीच्या वतीने संविधान सादर केले. जाती आणि धर्माचे राजकारण केंद्रस्थानी घेतल्यास राष्ट्राचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. भाजप आणि आरएसएसने पुन्हा धर्म आणि जातीवरून राजकारण सुरू केले आहे, असे आमचे ठाम मत आहे. हे केवळ आपल्या लोकशाहीला बाधा आणणार नाही तर आपले स्वातंत्र्य देखील कमी करेल. राज्यघटना सौहार्द, स्वातंत्र्य आणि समानतेची मागणी करते. जी वैदिक परंपरेत पाळली जात नाही, असं ते म्हणाले.

मोदींच्या मैदानात…

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात काल भारतीय संघाचा पराभव झाला. त्याबाबत विचारलं असता मोदींच्या मैदानात भारत हरला हा गंभीर विषय आहे. यावर मी विचार करून बोलेन. पण याबाबत आता लोकांनी बोलायला सुरुवात केलीये, हे फार चांगलं लक्षण नाही, असं ते म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.