Prakash Ambedkar : गां&#$ दम असेल तर मला उचलून दाखवा, ईडीच्या कारवाईवरून आव्हान देत प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही, मलाही ईडीची नोटीस दिली होती, ###दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी असे थेट आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिलं. मात्र यावेळी भाजपावर टीका करतांना मात्र प्रकाश आंबेडकर यांची जीभ घरसली होती.

Prakash Ambedkar : गां&#$ दम असेल तर मला उचलून दाखवा, ईडीच्या कारवाईवरून आव्हान देत प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली
अॅड. प्रकाश आंबेडकरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 4:06 PM

अमरावती : राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून (ED Notice) अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यावरून रोज एकमेकांवर तुटून पडत आहेत. केंद्रीय तपाय यंत्रणा या भाजपच्या (BJP) सांगण्यावरून सुडभावनेने कारवाई करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होते. तर यात आमचा कोणताही सहभाग नसल्याचे भाजप सांगत आहे. मात्र यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची जीभ घसरली आहे. देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे, उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहे, भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही, मलाही ईडीची नोटीस दिली होती, ###दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी असे थेट आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिलं. मात्र यावेळी भाजपावर टीका करतांना मात्र प्रकाश आंबेडकर यांची जीभ घरसली होती.

प्रकाश आंबेडकर काय म्हणताहेत ऐका

हिंदू-मुस्लिमांनी ताबा घ्यावा

तसेच इतर काही मुद्द्यांवरही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी भाष्य केले आहे. निवडणुकीबाबत दिलेल्या निर्णयावर ताबडतोब निर्णय घ्या हे सांगण्या ऐवजी तुम्ही निर्णय घ्या हे सांगणे घटनेला धरून नाही, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे. तसेच सभा अस्तित्वात नसतांना टॅक्स गोळा करण्याचा अधिकार आहे? यावर सगळ्या पक्षांनी आपलं मत मांडले पाहिजे, असेही ते म्हणाले. तर देशातील सध्याच्या धार्मिक राजकारणावर बोलताना ते म्हणाले, काश्मीर मध्ये साडे तीन जिल्हे आहेत, ज्याठिकाणी 5 लाख आर्मी उभी करूनही हा भाग ताब्यात घेऊ शकले नाही. त्यामुळे मुस्लिमांमधील वर्ग आणि हिंदू मधला वर्ग या दोघांनी आता पूर्ण ताबा घेतला पाहिजे तरच अशा दंगली थांबतील, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

हे सुद्धा वाचा

सीड कंपन्या नेत्यांच्या मालकीच्या

लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू आहे त्या वास्तूमध्ये आता लावणीचं व्हिडीओ शूट करून सुरू झाले यावर आपल्याला काय वाटते, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, कोणाला परवानगी द्यावी हे तिथल्या मंडळांनी निर्णय घ्यावा. तसेच खतांच्या वाढत्या दरावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पणन महासंघ असतांना खाजगी संस्था आल्या कशा? या देशाचे 80 टक्के शेतकरी कंपन्या या एकाच समाजाच्या आहेत. आदी बियाणे तयार करून पणन महासंघ विकत घेत होता पण आता हे बंद झाले आहे.  सीडस कंपन्या या सगळ्या आमदार खासदारांच्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. तर ओबीसी आरक्षणावरून त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. अजित पवार हे टीव्हीशी बोलल्यापेक्षा वकिलांना घेऊन खुली चर्चा का करत नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.