मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर यांचा टोला, सभागृहात मान्यता, बाहेर आल्यानंतर… भाजप फेवरमध्ये…
मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिले पाहिजे होते. पण, शिंदे कमिटीचे सदस्य यांनी घाई आणि दबाव असल्याचे म्हटले आहे. शिंदे समितीत असणारे सदस्य स्वतः न्यायाधीश म्हणून राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या भूमकेवर ठाम राहिले पाहिजे.
मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : राज्यातील शिंदे सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेत मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय आहे असे यावेळी सांगितले. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजूर केले. मात्र, याच विधेयकावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केलीय. जरांगे पाटील ह्यांनी हे विधेयक मान्य केलेले दिसत नाही. त्यांनी सगे सोयरे असा प्रयोग केला त्यामुळे ते मान्य केले नाही असे आंबेडकर म्हणाले.
मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिले पाहिजे होते. पण, शिंदे कमिटीचे सदस्य यांनी घाई आणि दबाव असल्याचे म्हटले आहे. शिंदे समितीत असणारे सदस्य स्वतः न्यायाधीश म्हणून राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या भूमकेवर ठाम राहिले पाहिजे होते. सगे सोयरे हा विषय नाही म्हणून जरांगे पाटील नाराज आहेत. तसेच, भाजप आरक्षणाच्या फेवरमध्ये नाही असे दिसत आहे. त्यामुळे सरकार फक्त वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
काँग्रेसनेही सभागृहात या विधेयकाला मान्यता दिली. परंतु, सभागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी विरोधात प्रतिक्रिया दिली हे काही समजलं नाही. एकत्र ठराव मंजूर करायचा आणि नंतर वेगळं बोलायचं असं कसं होणार. त्यातसुद्धा बाहेर येऊन असं बोलायचं मग आम्ही काय समजायचं? असा टोलाही त्यांनी लगावला
सरकारने 10 टक्के आरक्षण दिले म्हणून सांगितले. पण, ते नक्की कोणाला दिले हे सांगितलं नाही. या बिलाचे राज्यात एवढा चांगल्याप्रकारे स्वागत होईल असे वाटतं नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीच्या बैठकीला आम्ही गेलो होतो. तेव्हा त्या ठिकाणी बैठकीमध्ये आम्हाला सीटबद्दल काही सांगण्यात आले नाही. आपल्या विभागात आपल्याला प्रतिनिधित्व मिळावे असं प्रत्येकाला वाटत असत. पण, कोणती सीट कुणाला द्यायची हे अजून निश्चित झालेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील तीन घटकातील वाटप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्हाला काही बोलता येत नाही. महाराष्ट्रामध्ये मविआचे तीन घटक पक्ष आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी. त्यांच्या अजून काही ठरलं नाही. बैठकीला आम्ही गेलो तेव्हा देखील सांगितलं होते की पहिली चर्चा होईल. त्यानुसार आम्ही चर्चा कधी होणार याची वाट पाहत आहोत असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.