मनसेच्या नेत्यानं स्पष्टचं सांगितलं, भाजप सोबत युती नाही… महाविकास आघाडी सोबत तुलना करत नाराजी
भाजप आणि शिंदे गटाचे लोक राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे म्हणतात आणि राज ठाकरे वरील खटले, खोटे गुन्हे मागे घेत नाहीत, असे मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी म्हंटलं आहे.
मुंबई : गेल्या दिवसांपासून भाजप आणि मनसेची वाढती जवळीक युतीची चर्चा होण्यासाठी निमित्त ठरत होती. मात्र, आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होण्याची सध्या तरी शक्यता नसल्याचे मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी म्हंटले आहे. भाजप आणि शिंदे गटातील लोक राज ठाकरे यांच्यासोबत सोबत मैत्री आहे म्हणतात आणि राज ठाकरे वरील खटले खोटे गुन्हे मागे घेत नाहीत, अशी नाराजीही प्रकाश महाजन व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचा राजकारणात राज ठाकरे आपल्या सोबत पाहिजे आहे असं सरकारला वाटत असेल तर त्यांच्या बाजूने तरी विचार केला पाहिजे असेही प्रकाश महाजन यांनी म्हंटले आहे.
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये आमची भाजप सोबत युती होण्याची सध्या शक्यता दिसत नाही, पक्ष श्रेष्टी निर्णय घेतील तेव्हा घेतील परंतु सध्या आम्ही एकट्यानेच लढवण्याचं आम्ही विचार केलेला आहे.
आता तर कोणाची ना कोणाची तरी आघाडी होत असते त्यामुळे आम्ही नेत्याच्या प्रामाणिकपणावरती आणि मुंबई विषयी असलेल्या कल्पना यावर नागरिक देखील विश्वास ठेवतात व आम्ही त्याच मुद्द्यांना घेऊन निवडणूक लढवणार आहोत.
भाजप आणि शिंदे गटाचे लोक राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे म्हणतात आणि राज ठाकरे वरील खटले, खोटे गुन्हे मागे घेत नाहीत.
महाराष्ट्राचा राजकारणात राज ठाकरे आपल्या सोबत पाहिजे आहे असं सरकारला वाटत असेल तर त्यांच्या बाजूने तरी विचार केला पाहिजे.
सरकार बदललं तरी आम्हाला काही मदत झाली नाही पण त्यांना आमची मदत झाली. या सरकारकडून आम्हालाही अपेक्षा आहेत असं स्पष्ट प्रकाश महाजन म्हणाले आहे.