Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरे कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रकार, भाजपचा हल्लाबोल

मुख्यमंत्री मुद्दाम मंदिरं उघडत नाहीत, असा आरोप करत ते बार उघडतात मात्र मंदिरं उघडत नाहीत. लोकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

आरे कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रकार, भाजपचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 11:05 PM

मुंबई : आरेचा प्लान जेव्हा पास झाला तेव्हा सेना भाजपसोबत होती. सुप्रिम कोर्ट आणि हायकोर्टाने सांगितलं होतं की आरेत कोणतंही वनक्षेत्र नाही, मग प्रश्न आला कुठे?, असं म्हणत आरेमधलं कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला. (Prasad Lad Criticized Cm uddhav thackeray Over Aarey Car shed)

कांजूरमार्गची जी जागा आहे जिथे मेट्रोचं कारशेड तयार होणार आहे, ती जागा न्यायप्रविष्ट आहे. तिथे तिवरांची झाडे आहे. तसंच ती जागा लिटीगेशनमध्ये आहे. तिथे कारशेड कसं तयार होणार?, असा सवालही लाड यांनी विचारला. तसंच मुख्यमंत्र्यांनी आणखीही त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

मुख्यमंत्री मुद्दाम मंदिरं उघडत नाहीत, असा आरोप करत ते बार उघडतात मात्र मंदिरं उघडत नाहीत. लोकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका लाड यांनी केली.  मुख्यमंत्री मदिरालय उघडतात पण मंदिरं उघडत नाहीत. कोरोना संकट काळात ते बाहेर पडत नाहीत, घरात बसतात, लोकांनी घरात बसावं असं त्यांना वाटतं, असा टोला लगावत आमचा थेट आरोप आहे की ते मुद्दाम मंदीर ऊघडत नाहीत, असं प्रसाद लाड म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची मंदिरं उघडण्याबाबत घेतलेली भूमिका म्हणजे लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे. केंद्राने एसओपी तयार करून दिली आहे. मग त्यानुसार मंदिरं उघडण्यास काय हरकत आहे, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र भाजपने भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना धार्मिकस्थळं उघडण्याचा सल्ला द्यावा, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं होतं. शेख यांच्या या सल्ल्यावर लाड यांनी पलटवार केला. अस्लम शेख यांना भावनाच नाहीत. धर्माबद्दल, श्रद्धेबद्दल ज्याला काहीच ठाऊक नाही त्याला काय बोलावं, अशा शब्दात लाड यांनी अस्लम शेख यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्रात अजून दिशा कायदा आणखी नाही ही शोकांतिका- प्रसाद लाड

महाराष्ट्रात अजून दिशा कायदा बनला नाही ही शोकांतिका आहे. महिलांवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना सेंटरमध्ये बलात्कार होतायत, सरकार नेमकं काय करतंय, महिलांवरच्या वाढत्या अत्याचाराविरोधात आम्ही रस्त्यावर उचरणार असल्याचं लाड यांनी सांगितलं.

(Prasad Lad Criticized Cm uddhav thackeray Over Aarey Car shed)

संबंधित बातम्या

मोठी बातमी: मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

आरेतील कारशेड कांजूरला नेल्यास मेट्रोला पाच वर्षांचा विलंब आणि 5000 कोटींचा भुर्दंड- सोमय्या

'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?.
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?.