कार्यकर्त्याला कोरोनाची लागण, प्रशांत गडाखांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट, भेटीची नगर जिल्ह्यात एकच चर्चा

नेत्याने कार्यकर्ता कसा सांभाळावा याचा आदर्श वस्तुपाठ जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी घालून दिलाय.

कार्यकर्त्याला कोरोनाची लागण, प्रशांत गडाखांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट, भेटीची नगर जिल्ह्यात एकच चर्चा
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 7:20 PM

अहमदनगर : नेत्याने कार्यकर्ता कसा सांभाळावा याचा आदर्श वस्तुपाठ जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी घालून दिलाय. आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाली आहे हे समजताच त्यांनी त्याची रूग्णालयात जाऊन भेट घेतली तसंच त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. (Prashant Gadakh meet karykarta Manoj Wagh After he tested Corona positive) या भेटीची फोटो सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने एकच चर्चा ऐकायला मिळत आहेत.

सोनई येथील रहिवासी मनोज वाघ यांना कोरोनाची लागण झाली. ते गडाख यांचे कट्टर हाडाचे कार्यकर्ते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी दोन हात करतायत. हे गोष्ट समजल्यावर गडाख यांना रहावेनासं झालं. त्यांनी तडक रुग्णालयात जाऊन वाघ यांची भेट घेत त्यांची आस्थेने विचारपूस केली तसंच त्यांना धीर दिला.

मनोज यांच्या कुटुंबीयांची देखील गडाख यांनी विचारपूस करत मी तुम्हा सर्व कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. गडाख यांच्या साध्या माणुसकीने मनोज वाघ तसंच त्यांचे कुटुंबीय काही वेळ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. वाघ-गडाख भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होतायत.

प्रशांत गडाख मला भेटायला आले, यातच सगळं आलं. मी भरुन पावलो. कार्यकर्ता अडचणीत आहे हे कळताच नेता भेटायला येतो म्हणजे नेत्याला कार्यकर्त्याची काळजी असते. कार्यकर्ता जपला पाहिजे ही तळमळ प्रशांत भाऊंची कायम असते आणि आज देखील त्यांची हीच भावना त्यांनी कृतीतून दाखवून दिल्याचं मनोज वाघ यांनी सांगितलं.

प्रशांत गडाख यशवंत ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी काम करत असतात. अनेक गरजुंच्या मदतीला धावून जात त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे गडाख यांचं जनमाणसातलं स्थान आदराचे आहे.

(Prashant Gadakh meet karykarta Manoj Wagh After he tested Corona positive)

संबंधित बातम्या

मी नगरची निवडणूक लढणार नाही, प्रशांत गडाख यांचं जाहीर स्पष्टीकरण

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.