गौरी, ज्या कारणाने तू आत्महत्या केलीस, त्याला शिक्षा मिळेल, रक्ताचा असला तरी, प्रशांत गडाखांच्या भावनांचा स्फोट

तू चेष्टेत मला म्हणायचीस की 'तुमच्याआधी मीच जाणार' पण तू अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली" असं लिहित प्रशांत गडाखांनी आठवणीही जागवल्या आहेत.

गौरी, ज्या कारणाने तू आत्महत्या केलीस, त्याला शिक्षा मिळेल, रक्ताचा असला तरी, प्रशांत गडाखांच्या भावनांचा स्फोट
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 2:15 PM

मुंबई : “ज्या कारणाने तू आत्महत्येचा निर्णय घेतला असशील, त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी, हा मला आत्मविश्वास आहे” अशा शब्दात यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख (Prashant Gadakh) यांनी त्रागा व्यक्त केला आहे. प्रशांत गडाख यांची पत्नी आणि मंत्री शंकरराव गडाख यांची भावजय गौरी गडाख (Gauri Gadakh) यांनी दोन महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच प्रशांत गडाखांनी आपल्या भावना जाहीररित्या व्यक्त केल्या आहेत. (Prashant Gadakh reacts first time on Facebook after wife Gauri Gadakh Suicide)

“माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात. त्यात राजकीय विरोध असणारे पण वेदना जाणारेही होते. परंतु माझी मनस्थिती तेव्हा कुणालाही भेटण्याची नव्हती. त्याबद्दल सॉरी… माझी स्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल. नियतीने माझ्या वाट्याला मरुस्तपर्यंत जे वेदनेचं गाठोड दिलं आहे, ते मला घेऊनच चालावं लागेल” अशा भावना प्रशांत गडाख यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

‘वर्तमान जगायचंय मला’ ही माझी कविता जी इतरांना प्रेरणा होती, ती अशा रीतीने माझीच प्रेरणा होऊन बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. राजकारणात, समाजकारणात, स्वतःच्या आयुष्यात यश-अपयश, कठीण प्रसंग खूप आले. पण मी कधीही डगमगलो नाही. उलट त्यांना खंबीरपणे तोंड दिलं, लढलो… पण… गौरी तू मला हरवलं… माझा स्वभाव आलेल्या परिस्थितीशी लढण्याचा आहे, आता कुणाशी लढू… तू माझी पत्नी नव्हतीस, तर आई, बहीण, मैत्रीण सगळं काही होतीस, असं तूच मला म्हणायचीस ना.. तशीही तू मूडी होतीस, कधीकधी अचानक शांत राहायचीस. तू चेष्टेत मला म्हणायचीस की ‘तुमच्याआधी मीच जाणार’ पण तू अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली” असं लिहित प्रशांत गडाखांनी आठवणीही जागवल्या आहेत.

“साहेबांची सगळ्यात आवडती सून नाही, तर तू मुलगी, आपल्या नेहल, दुर्वा आणि मी.. आमचं काय चुकलं गं.. रोज रात्री झोपताना असं तुझ्याशी भांडतो मी.. माझा आवाज पोहोचतो का गं तुझ्यापर्यंत.. मला कोणाचीही सहानुभूती नको आहे, पण एक नक्की की माझा नियतीवर भरवसा आहे. ज्या कारणाने तू हा निर्णय घेतला असशील, त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी.. हा मला आत्मविश्वास आहे.” असंही प्रशांत गडाख यांनी लिहिलं आहे.

“गौरी मी घरी नव्हतो, तू निष्प्राण.. आपल्या लहान मुलीने पाहिलं गं खिडकीतून.. गौरी, तुला मी नेहमी म्हणायचो की, मी आहे तुझ्यामागे. मी आता खरंच फकीर झालोय, पण मला माझ्यासमोर माझ्या मुली, माझे वडील, माझ्यावर अवलंबून हजारो संसार दिसतात. मित्रांनो मी जरी तुमच्यात आलो, तरी ही घटना मला एक दोन महिन्यात सावरु शकत नाही. प्लीज, माझी भावना तुम्ही समजून घ्याल. मी स्वतःहून ठामपणे सांगायचो की, मी राजकारणात येणार नाही, पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, आता काळच ठरवेल की मी राजकारणात यायचं की नाही” अशा भावना प्रशांत गडाख यांनी व्यक्त केल्या आहेत.

“माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं ते मी माझ्या आयुष्यभर विसरु शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात माझ्या दोन्ही मुली, माझे आई-वडील आणि तुम्ही सर्व जिवलग मित्र आहात. आपण भेटू, तेव्हा कृपा करुन माझं सांत्वन करु नका. न विसरता येणारी ती घटना मला निदान तुमच्यात असताना विसरायची आहे. जेव्हा भेटू तेव्हा तुमचे काम सांगा, समाजाची कामे सांगा, नवनिर्मितीची चर्चा करा. तुमच्याशी व्यक्त व्हावसं वाटलं म्हणून हात मोकळा झाला आणि माझं मनही…” अशा पद्धतीने गडाख यांनी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या.

संबंधित बातम्या

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिनी राहत्या घरात मृत आढळल्या

गौरी गडाख यांची आत्महत्या गळफास घेऊनच, शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट

गडाख कुटुंबाच्या कठीणकाळात शिवसेनेचा ‘तारणहार’ सरसावला, मिलिंद नार्वेकर सांत्वनासाठी नगरला

(Prashant Gadakh reacts first time on Facebook after wife Gauri Gadakh Suicide)

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.